Tennis Championship : अधिराज, आरव, प्रार्थनाचा उपांत्य फेरीत प्रवेश

शेपिंग चॅम्पियन्स फाउंडेशन पुणे आयोजित चौदा वर्षांखालील गटाच्या अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत मुले व मुलींच्या गटातून अधिराज दुधाणे, आरव पटेल व प्रार्थना खेडकरने मानांकित खेळाडूंना हरवून उपांत्य फेरी गाठली.
Tennis Championship
Tennis Championshipsakal

पुणे : शेपिंग चॅम्पियन्स फाउंडेशन पुणे आयोजित चौदा वर्षांखालील गटाच्या अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत मुले व मुलींच्या गटातून अधिराज दुधाणे, आरव पटेल व प्रार्थना खेडकरने मानांकित खेळाडूंना हरवून उपांत्य फेरी गाठली.

म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीत टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात सहाव्या मानांकित आरव पटेलने अव्वल मानांकित प्रजीतरेड्डी मदिरेड्डीचा ६-३, ६-१ असा, बिगरमानांकित अधिराज दुधाणेने चौथ्या मानांकित अंश रामाणीचा ६-४, ६-२ असा, तिसऱ्या मानांकित सर्वज्ञ सरोदेने यशवंतराजे पवारचा ६-४, ६-३ असा तर नमिश हुडने अंशुल पुजारीचा ६-३, ७-५ असा पराभव केला.

मुलींच्या गटात पाचव्या मानांकित प्रार्थना खेडकरने अव्वल मानांकित श्रावी देवरेवर ०-६, ६-३, ६-४ असा, शर्मिष्ठा कोद्रेने ओवी मारणेवर ६-१, ६-१ असा, दुसऱ्या मानांकित स्वरा जावळेने आठव्या मानांकित वीरा हरपुडेवर ६-०, ४-६, ६-३ असा तर तिसऱ्या मानांकित जान्हवी चौगुलेने रितू ग्यानवर ६-२, ६-१ असा विजय मिळविला.

Tennis Championship
FIFA World Cup 2026 क्वालिफायरसाठी भारतीय संघ सौदी अरेबियाला रवाना, कधी अन् केव्हा होणार सामना, जाणून घ्या

निकाल

दुहेरी गट मुले : उपांत्यपूर्व फेरी : सुजय देशमुख व नमिश हुड वि.वि. अभिनव शर्मा व रौनक सेठी ६-४, ५-७, १०-४; प्रजीतरेड्डी मदिरेड्डी व अंशुल पुजारी वि.वि. यशवंतराजे पवार व अद्वैत गुंड ६-३, ६-१; तनिश पाटील व लक्ष्य त्रिपाठी वि.वि. वेदांत जोशी व पीयूष रेड्डी ६-२, ७-५; आरुष पोतदार व आरव पटेल वि.वि. रिशव रावल व श्री चरण समिनेनी ६-१, ६-३.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com