Afghanistan boycotts Pakistan after deadly airstrike
esakal
क्रीडा
भ्याड हल्ल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट अॅक्शन मोडवर, भारताप्रमाणे पाकिस्तानशी क्रिकेट न खेळण्याचा निर्णय, तिरंगी मालिकेतून माघार
Afghanistan boycotts Pakistan after deadly airstrike : अफगाणिसातान क्रिकेट बोर्डानं एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत क्रिकेटपटूंच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच पाकिस्तानशी क्रिकेट न खेळण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानने पुन्हा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला आहे. हा हल्ला अफगाणिस्तान च्या पक्तिका प्रांतावर करण्यात आला असून यावेळी रहिवासी भागांना लक्ष्य करण्यात आलं आहे. या हल्यात महिलांसह ४० जणांचा मृत्यू झाला असून यात तीन क्रिकेटपटूंचा देखील समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे या तीन क्रिकेटपटूंच्या मृत्यूनंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड अॅक्शन मोडवर आलं असून त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
