NED vs AFG : नेदरलँड्सने स्वतःच्याच पायावर मारून घेतली कुऱ्हाड; अफगाणिस्ताननं 200 च्या आत रोखलं

NED vs AFG
NED vs AFG esakal

NED vs AFG : वर्ल्डकप 2023 मध्ये आज नेदरलँड्स आणि अफगाणिस्तान हे दोन बिग अपसेट देणारे संघ भिडत आहेत. या सामन्यात नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र लखनौच्या फिरकीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर अफगाणिस्तानने नेदरलँड्सला 179 धावात रोखत सामन्यावर पकड निर्माण केली आहे.

अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या आहेत. तर नेदरलँड्सचे चार फलंदाज हे धावबाद झाले.

NED vs AFG
NED vs AFG : अफगाणिस्तानने नेदरलँड्सला 200 च्या आत रोखलं

अफगाणिस्तानने नेदरलँड्सला पहिल्याच षटकात नेदरलँड्सला धक्का दिला होता. मुजीबने सलामीवीर बार्रेसीला 1 धावेवर बाद केले. मात्र त्यानंतर मॅक्स ओडोव्हड आणि अॅकरमनने नेदरलँंड्सला 73 धावांपर्यंत पोहचवले. नेदरलँड्स आता मोठी धावसंख्या उभारणार असे वटात असतानाच त्यांचे तीन फलंदाज धावबाद झाले.

73 धावांवर 42 धावा करणारा मॅक्स धावबाद झाला. त्यानंतर 92 धावांवर अॅकरमन आणि कर्णधार एडवर्ड धावबाद झाले. या आत्मघातातून नेदरलँड्सला सावण्याचा प्रयत्न सायब्रंटने केला.

NED vs AFG
IPL : सौदीचा फुटबॉलनंतर आता आयपीएलवर डोळा; इंग्लिश प्रीमियर लीग पेक्षाही मोठं गणित?

मात्र मोहम्मद नबीच्या भेदक माऱ्यासमोर दुसऱ्या बाजूने नेदरलँड्सची पडझड होतच राहिली. शंभरच्या आत नेदरलँड्सचा निम्मा संघ गारद झाल्यानंतर त्याने 58 धावांची झुंजार खेळी करत संघाला 150 च्या जवळ पोहचवले. मात्र तोपर्यंत नेदरलँड्सचे सात फलंदाज बाद झाले होते.

अखेर सायब्रंट देखील 58 धावा करून धावबाद झाला. त्यानंतर नबी आणि अहमदने नेदरलँड्सचा 179 धावात डाव गुंडाळला.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com