गोळाफेकपटू इंद्रजित सिंह उत्तेजक चाचणीत दोषी

वृत्तसंस्था
सोमवार, 1 ऑगस्ट 2016

नवी दिल्ली - रिओ ऑलिंपिक स्पर्धा अवघी काही दिवसांवर आली असताना भारताला आणखी एक धक्का बसला आहे. कुस्तीपटू नरसिंग यादवपाठोपाठ आता भारताचा गोळाफेकपटू इंद्रजित सिंह उत्तेजक द्रव सेवन चाचणीत दोषी आढळला आहे. 

नरसिंग यादव उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने अगोदरच वाद निर्माण झाला असताना आता इंद्रजितही चाचणीत दोषी आढळल्याने भारतासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, इंद्रजितची 22 जूनला घेण्यात आलेल्या चाचणीत बंदी असलेले स्टेराईडचे सेवन केल्याचे समोर आले होते. या प्रकरणी राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेकडून (नाडा) याबाबतची माहिती अॅथलेटिक्स फेडरेशनला पत्र पाठवून दिली आहे. 

इंद्रजितने एशियन चॅम्पियनशिप, एशिअन ग्रँड प्रिक्स आणि वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये सुवर्णपदक पटकाविले आहे. रिओ ऑलिंपिकसाठी पात्र ठरणारा तो पहिला भारतीय पहिला खेळाडू ठरला होता.

Web Title: After Narsingh Yadav, Inderjeet Singh's failed dope test adds to India's Rio Olympics woes