रोहित पाठोपाठ आता इंग्लंडच्या कसोटी संघातही कोरोनाचा शिरकाव

After Rohit Sharma England Wicket Keeper Ben Foakes Also Tested COVID 19 Positive
After Rohit Sharma England Wicket Keeper Ben Foakes Also Tested COVID 19 Positive esakal

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये 1 जुलैपासून एकमेव कसोटी सामना होणार आहे. हा सामना गेल्या वर्षीच्या कसोटी मालिकेतील स्थगित केलेला पाचवा कसोटी सामना आहे. मात्र हा सामना सुरू होण्यापूर्वीच पुन्हा एकदा या कसोटीवर कोरोनाची वक्रदृष्टी पडली आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा सराव सामन्यादरम्यान कोरोनाग्रस्त झाला. तर आता न्यूझीलंडविरूद्ध शेवटची कसोटी खेळत असलेल्या इंग्लंडच्या संघातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. विकेटकिपर बेन फोक्सला कोरोनाची लागण झाली आहे.

याबाबतची माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ट्विट करून दिली. इंग्लंडने 'इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज बेन फोक्सचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या जागी आता रिप्लेसमेंट म्हणून सॅम बिलिंग्जचा समावेश करण्यात आला आहे.

https://twitter.com/englandcricket/status/1540979476745650181

After Rohit Sharma England Wicket Keeper Ben Foakes Also Tested COVID 19 Positive
कर्णधार हार्दिक पांड्या ऋतुराजला सलामीला न पाठवण्याबात म्हणतो..

फोक्स आता न्यूझीलंड विरूद्ध सुरू असलेल्या उर्वरित तिसऱ्या कसोटीत खेळू शकणार नाही. काल त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे आता त्याला तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी विकेटकिपिंग करता आली नाही. त्याच्या जागी जॉनी बेअरस्टोने विकेटकिपिंग केली.

याबाबत इसीबीने (England Cricket Board) 'फोक्स संघात कधी परतणार याबाबतची माहिती योग्य वेळी दिली जाईल. अशी आशा आहे की तो भारताविरूद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी तंदुरूस्त होईल.' असे वक्तव्य प्रसिद्ध केले. यापूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्मा देखील सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी खेळला आणि त्यांनतर त्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याला सामना अर्ध्यावर सोडावा लागला. त्याच्याही इंग्लंड विरूद्धच्या कसोटी सामन्यात खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

After Rohit Sharma England Wicket Keeper Ben Foakes Also Tested COVID 19 Positive
मयांक इंग्लंडसाठी रवाना; रोहितसाठी बीसीसीआयचा 'बॅकअप प्लॅन'

यापूर्वी भारतीय संघातील विराट कोहली आणि आर. अश्विन यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळेच अश्विन उशिरा संघात सामिल झाला. गेल्या वर्षीच्या अर्धवट राहिलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 2 - 1 अशी आघाडी घेतली आहे. मात्र भारतीय संघात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने मालिकेतील शेवटचा ओल्ड ट्रॅफोर्ड येथील सामना स्थगित करण्यात आला होता. हाच सामना 1 जुलै रोजी बर्मिंगहॅम येथील एजबस्टनमध्ये होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com