कर्णधार हार्दिक पांड्या ऋतुराजला सलामीला न पाठवण्याबात म्हणतो.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hardik Pandya Clarify Why Ruturaj Gaikwad not Open The Inning In 1st T20I Against Ireland

कर्णधार हार्दिक पांड्या ऋतुराजला सलामीला न पाठवण्याबात म्हणतो..

डब्लिंग : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात आयर्लंडमध्ये खेलणाऱ्या भारतीय संघाने पहिला सामना 7 गडी राखून जिंकत दोन सामन्यांच्या मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे. पावसामुळे प्रत्येकी 12 षटकांच्या झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या आयर्लंडने भारतासमोर 109 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान भारताने 9.3 षटकात तीन फलंदाजांच्या मोबदल्यातच पार केले. (Hardik Pandya Clarify Why Ruturaj Gaikwad not Open The Inning In 1st T20I Against Ireland)

हेही वाचा: मयांक इंग्लंडसाठी रवाना; रोहितसाठी बीसीसीआयचा 'बॅकअप प्लॅन'

हार्दिक पांड्याची भारताचा कर्णधार म्हणून विजयाने सुरूवात जरी झाली असली तरी त्यांना या सामन्यात घेतलेल्या निर्णयावर टीका देखील होत आहे. हार्दिक पांड्याने सलामीवीर ऋतुराज गायकवाडला सलामीला पाठवले नाही. त्याच्या ऐवजी इशान किशन आणि दीपक हुड्डाने भारतीय डावाची सुरूवात केली.

दरम्यान, सामना झाल्यानंतर व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्समध्ये हार्दिक पांड्याने ऋतुराज गायकवाड सलामीला का आला नाही याचा खुलासा केला. तो म्हणाला, 'ऋतुराजच्या पायाला दुखापत झाली होती. तरी देखील आमच्याकडे जोखीम घेऊन त्याला सलामीला पाठवण्याचा पर्याय होता. मात्र मला हा पर्याय योग्य वाटला नाही. खेळाडूची तंदुरूस्ती सगळ्यात महत्वाची. मला वाटले की आम्ही सामन्यातील परिस्थिती हाताळू. जी काही आमची बॅटिंग ऑर्डर आहे त्यापेक्षा एक क्रमांक वर सर्वांना फलंदाजी करावी लागले. ही काही फार मोठी डोकेदुखी नव्हती. आम्हाला ऋतुराजबाबत कोणताही धोका घ्यायचा नव्हता.'

हेही वाचा: उमरानने नव्हे तर भुवनेश्वरने मोडले शोएबचे वर्ल्ड रेकॉर्ड?

हार्दिकने उमरान मलिकच्या (Umran Malik) पदार्पणाविषयी (Debut) वक्तव्य केले. तो म्हणाला, 'ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा भारताकडून खेळता त्यावेळी गुणवान खेळाडूला थोडा वेळ देणे गरजेचे असते. त्यांचा दिवस चांगला होता की वाईट असा विचार करणे संयुक्तिक नाही. त्याच्यासाठी भारताकडून खेळणे हीच मोठी गोष्ट होती. याच गोष्टीसाठी मी खूप आनंदी आहे. त्यामुळे त्याचे पदार्पण चांगले झाली की वाईट याचा फार विचार करण्याची गरज नाही.'

भारताने आयर्लंडविरूद्धच्या मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे. आता या मालिकेतील दुसरा आणि अंतिम टी 20 सामना हा मंगळवारी 28 जूनला डब्लिंग येथे होणार आहे. या सामन्यात भारताला मालिका विजयाची संधी आहे.

Web Title: Hardik Pandya Clarify Why Ruturaj Gaikwad Not Open The Inning In 1st T20i Against Ireland

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..