भारताला बरोबरीचा धक्का 

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

पहिल्या दोन सत्रांत कोंडी फुटू शकली नाही. तिसऱ्या सत्रात कोरियाने खाते उघडले होते. जुंगजून ली याने हा गोल केला. वरुण कुमार आणि सुरेंदर कुमार त्याला रोखू शकले नाहीत. जाळ्याजवळून जुंगजून याने गोल केला. 

ढाका : कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवरील भारदस्त विजयासह आशिया करंडक हॉकी स्पर्धेच्या सुपर फोर्समध्ये प्रवेश केलेल्या भारताला सलामीलाच कोरियाविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले. गुर्जंत सिंग याने अखेरच्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे भारताला सुटकेचा निःश्‍वास टाकता आला. 

पहिल्या दोन सत्रांत कोंडी फुटू शकली नाही. तिसऱ्या सत्रात कोरियाने खाते उघडले होते. जुंगजून ली याने हा गोल केला. वरुण कुमार आणि सुरेंदर कुमार त्याला रोखू शकले नाहीत. जाळ्याजवळून जुंगजून याने गोल केला. 

सलग तीन विजय मिळविल्यानंतर भारताचा कस असा पहिल्यांदाच लागला. सहाव्या क्रमांकावरील भारत अखेरच्या मिनिटापर्यंत पिछाडीवर होता, पण गुर्जंतने एक गुण कमावून दिला. अंतिम टप्प्यात सतत आक्रमणे केल्यामुळे भारताला ही संधी मिळू शकली. पहिला पेनल्टी कॉर्नर पहिल्या सत्राच्या अखेरच्या मिनिटाला मिळाला. त्यावरील अपयशाची रडकथा कायम राहिली. हरमनप्रीत याने काटकोनात फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत कोरियाच्या बचाव फळीने चेंडू ताब्यात घेतला. 

निकाल 
भारत : 1 (गुर्जंतसिंग 1) बरोबरी वि. कोरिया (जुंगजून ली 41) 
--- 
मलेशिया : 3 विवि पाकिस्तान : 2

Web Title: Aisa cup hockey India equals South Korea