
नवी दिल्ली : अखिल भारतीय टेनिस संघटनेचे (एआयटीए) वित्त समितीचे सदस्य हिरोनमोय चॅटर्जी यांनी अध्यक्ष अनिल जैन यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचा आरोप केला आहे. अनिल जैन यांनी पत्नीसोबत ग्रँडस्लॅम पाहण्यासाठी परदेशवारी केली आहे. यादरम्यान एक कोटीपेक्षा अधिक रुपये चुकीच्या पद्धतीने खर्च करण्यात आले आहेत. चॅटर्जी यांच्याकडून आरोप करण्यात आल्यानंतर जैन यांनी हे फेटाळून लावले आहेत. पत्नीसोबत फिरण्याचा अधिकार माझ्याकडे आहे, असे ते पुढे म्हणाले आहेत.