

Ajay Nimbalkar
Sakal
खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेतील कुस्ती प्रकारात महाराष्ट्राने निराशाजनक कामगिरी प्रदर्शन घडवले. पुरूष गटात मजुरचा मुलगा असणाऱ्या अजय निंबाळकरने ग्रीको रोमन 55 किलो गटात रौप्य तर सृष्टी भोसले व समृद्धी घोरपडे यांनी कांस्य पदकाची कमाई केली आहे. पुरुषांच्या गटात पदक विजेता ठरलेला अजय हा महाराष्ट्राचा एकमेव कुस्तीगीर ठरला आहे.