INDvsSA : डॅडी अजिंक्यसाठी मुलगी लकी; झळकाविले मालिकेतील पहिले शतक

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 October 2019

मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली बाद झाल्यावर रहाणेने रोहितला सुंदर साथ दिली. हे त्याचे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील दुसरे शतक आहे. यापूर्वी त्याने वेस्ट इंडिज विरुद्ध शतक झळकाविले होते

रांची : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेने शानदार फलंदाजी करत मालिकेतील पहिले शतक झळकाविले. 

मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली बाद झाल्यावर रहाणेने रोहितला सुंदर साथ दिली. हे त्याचे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील दुसरे शतक आहे. यापूर्वी त्याने वेस्ट इंडिज विरुद्ध शतक झळकाविले होते. हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील 11वे शतक आहे. 

त्याने 169 चेंडूंमध्ये शतक झळकाविले. त्याच्या साथीने रोहित शर्मानेही जोरदार फलंदाजी करत भारताची धावसंख्या अडीचशे पार नेली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajinkya Rahane complete century against South Africa in Ranchi