
Ranji Trophy: अजिंक्य रहाणे म्हणजे केला तर शंभर नाही तर...
भारतीय कसोटी संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) हंगामाच्या पहिल्या सामन्यात शतक झळकावून कसोटी संघातील आपले स्थान पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याने सौराष्ट्र विरूद्धच्या सामन्यात पहिल्या डावात 129 धावांची खेळी केली होती. त्यामुळे अजिंक्य रहाणे पुन्हा फॉर्ममध्ये आला असे सर्वांना वाटले. मात्र या कामगिरीत त्याला सातत्य राखता आले नाही. तो गोव्याविरूद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात शुन्यावर बाद झाला. (Ajinkya Rahane Once Again Fail To Score)
हेही वाचा: स्मृतीची स्मरणीय खेळी; अखेर 5 पराभवानंतर टीम इंडिया जिंकली!
मुंबई विरूद्ध गोवा (Mumbai vs Goa) या रणजी ट्रॉफी सामन्यात सर्वांची नजर ही अजिंक्य रहाणेवर होती. त्याने सौराष्ट्र विरूद्धच्या पहिल्या सामन्यात 129 धावांची खेळी करत आपल्यात अजून धमक असल्याचे दाखवून दिले होते. मात्र त्याचा श्रीलंकेविरूद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी विचार करण्यात आला नाही. असे असले तरी त्याच्या कामगिरीवर सर्वांचेच लक्ष होते. मात्र तो गोव्यासारख्या तुलनने कमकूवत संघाविरूद्ध अपयशी ठरला.
हेही वाचा: पंजाब किंग्जच्या कर्णधारपदाची माळ गब्बरच्या गळ्यात नाही?
गोव्याविरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईची सुरूवात खराब झाली. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) 9 धावांची भर घालून माघारी परतला. त्यानंतर दुसरा सलामीवीर गोमेल देखील 21 धावा करून बाद झाला. त्यामुळे मुंबईची सर्व मदार अनुभवी अजिंक्य रहाणे आणि सचिन यादव यांच्यावर होती. मात्र अजिंक्य रहाणे तीन चेंडू खेळून एकही धाव न करता माघारी गेला.
Web Title: Ajinkya Rahane Got Duck In Ranji Trophy Match Against Goa
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..