esakal | जारवोप्रमाणे रहाणेला ओढून बाहेर काढा; अंजिक्य होतोय ट्रोल
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs ENG

जारवोप्रमाणे रहाणेला ओढून बाहेर काढा; अंजिक्य होतोय ट्रोल

sakal_logo
By
सुशांत जाधव

इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतील दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणेला खातेही उघडता आले नाही. सातत्याने अपयश पदरी आल्यानंतर चौथ्या कसोटी सामन्यात अजिंक्य ऐवजी रविंद्र जडेजाला बढती दिल्याचे पाहायला मिळाले होते. उप-कर्णधार रहाणेसाठी हा एक इशाराच होता. यातून तो अधिकच दडपणाखाली आला असून दुसऱ्या डावात तो आणखीनंच अडखला.

रविंद्र जडेजा बाद झाल्यानंतर रहाणे मैदानात आला. त्याने आठ चेंडू खेळले पण त्याला एकही धाव करता आली नाही. क्रिस वोक्सने त्याला पायचित केले. LBW निर्णयावर अजिंक्य रहाणे नॉन स्ट्राइकला असलेल्या विराट कोहलीसोबत रिव्ह्यू संदर्भात चर्चा करताना दिसले. पण विराटने क्लियप आउट असल्याचे सांगत रिव्ह्यू घेण्याची रिस्क घेतली नाही.

हेही वाचा: रवी शास्त्री कोविड पॉझिटिव्ह; इतर दोन कोचसह चौघे आयसोलेशनमध्ये!

हेही वाचा: "मला माहिती होतं..."; दमदार शतकानंतर रोहितची खास प्रतिक्रिया

इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणेच्या रुपात टीम इंडियाने पाचवी विकेट गमावली. अजिंक्य रहाणेच्या पदरी पुन्हा एकदा अपयश आल्यानंतर सोशल मीडियावर तो ट्रोल होताना दिसतोय. गेल्या काही सामन्यात इंग्लंडमधील जारवो नावाचा चाहता वांरवार मैदानात खेळायला येताना दिसतोय.

सुरक्षा रक्षकाकडून त्याला बाहेर काढतानाचे व्हिडिओ आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याच फोटोच्या माध्यमातून काहीजण रहाणेला ट्रोल करत आहेत. जारवोप्रमाणे आता अंजिक्य रहाणेला ओढून बाहेर काढण्याची वेळ आल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

मागील दहा कसोटी सामन्यात रहाणेनं अवघ्या 346 धावा केल्या आहेत. यात त्याला केवळ दोन अर्धशतकांचा समावेश असून त्याच्या धावांची सरासरी 20.35 अशी आहे. 2015 पासून 57 कसोटी सामन्यानंतर पहिल्यांदाच अजिंक्य रहाणेच्या धावांची सरासरी ही 40 च्या आत आहे.

loading image
go to top