मी माझा खारीचा वाटा उचलला, तुम्हीही पूरग्रस्तांना मदत करा : अजिंक्य रहाणे

Ajinkya Rahane tweets about flood in Kolhapur and Sangli
Ajinkya Rahane tweets about flood in Kolhapur and Sangli

मुंबई : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापूरात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. आता शहरांतील पूर ओसरु लागला आहे आणि सर्व पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे. पाणी ओसरत असले तरी आता नव्याने संसार उभं कऱण्याचे आव्हान सर्वांसमोर आहे. सारेच शक्य की मदत करत आहे. अशातच भारताच फलंदाज अजिंक्य रहाणेने सुद्धा पूरग्रस्तांसाठी भावनिक ट्विट केले आहे. 

''आपल्याला माहित असेलच, महाराष्ट्रात सध्या पूरामुळे प्रचंड वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर-सांगली येथे विशेष मदतीची गरज आहे. अशा वेळी आपण पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. मी मदत करून माझा खारीचा वाटा उचलतो आहे, आपणसुद्धा जमेल तशी मदत नक्की करा,'' असे भावनिक ट्विट करत त्याने पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com