रहाणेच खरा जंटलमॅन; शेतकऱ्यांविषयी बघा काय म्हणाला..!

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 मार्च 2019

भारतीय क्रिकेटमधील जंटलमन अशी ओळख असणारा अजिंक्य रहाणेने त्याची माणुसकी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. त्याने त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन शेतकऱ्यांचे आभार मानणारा व्हिडिओ शेअर केला आहे. 

मुंबई : भारतीय क्रिकेटमधील जंटलमन अशी ओळख असणारा अजिंक्य रहाणेने त्याची माणुसकी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. त्याने त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन शेतकऱ्यांचे आभार मानणारा व्हिडिओ शेअर केला आहे. 

तो स्वत: शेतकरी कुटुंबातील असल्याने त्याला शेतकऱ्यांविषयी खूप आदर आहे. त्यांच्या मेहनतीमुळेच आपण सुखाचे घास घेत आहोत, असे मत व्यक्त करत त्याने एका शेतकऱ्यासोबतचा व्हिडिओ शेअर करत त्यांचे आभार मानले आहेत. ''आज आपल्याला जे काही फळं, भाज्या  मिळतात ते सर्व शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे मिळतात. त्यामुळे आपल्या जीवनातील त्यांचे योगादान फार महत्त्वाचे आहे. आपल्या ताटातील अन्न मिळण्यामागे एका शेतकऱ्याची मेहनत आहे याचा आपल्याला कधीच विसर पडता कामा नये,'' असे मत त्याने व्यक्त केले आहे. 

भारतीय संघातील सर्वच खेळाडूंनी वेळोवेळी आपले सामाजिक भान दाखवले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने लष्कराची कॅप घालून त्या सामन्याचे मानधनही राष्ट्रीय सुरक्षा निधीला दिले. त्यांनंतर आता रहाणेनेही त्याच्या माणुसकीचे दर्शन घडविले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajinkya Rahane urges to respect farmers