...म्हणून मी निवडणूक लढणार नाही- अजित पवार

अजित पवार
अजित पवार

मुंबई : राज्याची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे मी भारतीय महासंघातील पदाला वेळ देऊ शकणार नाही, त्या पदाला योग्य वेळ देण्याची जबाबदारी पार पाडू शकत नसेल, तर तिथे जाणे योग्य नव्हे. मी जे काम हाती घेतो ते पूर्ण जबाबदारीने पार पाडतो असे राज्यातील कबड्डी पदाधिकाऱ्यांना सांगत अजित पवार यांनी कबड्डी महासंघाची निवडणून न लढण्याचा आपला निर्णय सांगितला आहे.

भारतीय कबड्डी महासंघाच्या निवडणुकीत अजित पवार उमेदवार नसणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीसाठी संलग्न संघटनांना प्रतिनिधींची नावे पाठवायची आहेत. महाराष्ट्र राज्य संघटनेच्या प्रतिनिधीत पवार यांचे नाव नसणार हे स्पष्ट झाले आहे.

भारतीय कबड्डी महासंघाच्या प्रशासकांनी निवडणुकीचा कार्यक्रम तयार केला आहे. त्यानुसार 17 ऑगस्टपर्यंत प्रत्येक संघटनेस दोन नावे पाठवण्यास सांगितले आहे. राज्य कबड्डी संघटनेने आस्वाद पाटील हे एक नाव निश्‍चित केले आहे; मात्र दुसऱ्या नावाबाबत अद्याप एकमत झालेले नाही.

भारतीय कबड्डी महासंघाची निवडणूक आता मुख्य निवडणूक आहे. या निवडणुकीतील कार्यकारिणीकडे महासंघाची सूत्रे असतील आणि महासंघावरील प्रशासकांची सूत्रे संपुष्टात येतील. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अजित पवार भारतीय कबड्डी महासंघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. मात्र आता अजित पवार यांनी निवडणुकीसाठी राज्याचे प्रतिनिधीही होण्यास नकार दिला आहे.

राज्य संघटना लवकरच आपली दोन नावे पाठवणार आहे. माझे नाव निश्‍चित आहे, अन्य एका नावाबाबत चर्चा सुरू आहे. अजित पवार यांचे नाव त्यात नक्की नसेल, असे राज्य कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह आस्वाद पाटील यांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com