US Open: झ्वेरेव सलग चौथ्यांदा ग्रँडस्लॅमच्या सेमीफायनलमध्ये; फायनलच्या तिकिटासाठी कोणाविरुद्ध होणार लढती?

US OPEN 2026 SEMIFINALS: अव्वल मानांकित व जर्मनीचा स्टार खेळाडू ॲलेक्झँडर झ्वेरेव यावर्षी दमदार फॉर्ममध्ये आहे. त्याने अमेरिकन ओपनच्या सेमीफायनलमध्येही धडक मारली आहे. आता सेमीफायनलमधील लढती कोणाच्या कोणाविरुद्ध होणार जाणून घ्या.
Alexander Zverev Storms Into US OPEN 2026 Semifinals

Alexander Zverev Storms Into US OPEN 2026 Semifinals

Sakal

Updated on

Alexander Zverev Storms Into US Open 2026 Semifinals: अव्वल मानांकित व जर्मनीचा स्टार खेळाडू ॲलेक्झँडर झ्वेरेव याचा दमदार फॉर्म अमेरिकन ओपन या टेनिस ग्रँडस्लॅममध्ये कायम राहिला. झ्वेरेव याने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत नेदरलँड्स‌च्या बोटीक वॅन डी झँडस्कल्प याला सरळ तीन सेटमध्ये पराभूत करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

झ्वेरेवसमोर आता अंतिम चार फेरीच्या लढतीत रशियाच्या करेन हाचानोव याचे आव्हान असणार आहे. बेल्जियमच्या ॲलेक्झँडर ब्लॉक याने दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे करेन हाचानोव याला पुढे चाल देण्यात आली.

Alexander Zverev Storms Into US OPEN 2026 Semifinals
US Open 2026: पहाटे ३.३३ वाजेपर्यंत रंगला थरार; ४ तास २८ मिनिटांच्या लढतीनंतर शेल्टनने गतविजेत्या अल्काराझला दिला धक्का
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com