

US Open 2026
esakal
न्यूयॉर्क : गतविजेता कार्लोस अल्काराझचे अमेरिकन ओेपन या टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेतील आव्हान गुरुवारी पहाटे संपुष्टात आले. अमेरिकेच्या २३ वर्षीय बेन शेल्टन याने स्पेनच्या स्टार खेळाडूवर पाच सेटमध्ये रोमहर्षक विजय साकारला. बेन शेल्टन याने ६-७, ६-१, ६-३, १-६, ७-६ असा पाच सेटमध्ये चार तास आणि २८ मिनिटांमध्ये विजय मिळवला.