VIDEO : 'पोल खोल' जखमी खेळाडूच्या उपचारासाठी PCB कडं पैसाच नाही : Shahid Afridi

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शाहीनच्या उपचारासाठी पैसे दिले नसल्याचा खुलासा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने केला आहे.
Shahid Afridi Pakistan Team
Shahid Afridi Pakistan Teamsakal

Shahid Afridi Pakistan Team : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने T20 विश्वचषकासाठी 15 जणांचा संघ जाहीर केला आहे. यामध्ये दुखापतीमुळे आशिया कपमध्ये न खेळलेल्या शाहीन आफ्रिदीचीही निवड करण्यात आली आहे. शाहीन उपचारासाठी लंडनला गेली होती. त्याची अनुपस्थिती आशिया कपमध्ये संघाचा अंतिम फेरीत दारुण पराभव झाला. शाहीन आफ्रिदीच्या पुनरागमनाने आता पाकिस्तानी संघाचे मनोबल उंचावले आहे. दरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शाहीनच्या उपचारासाठी पैसे दिले नसल्याचा खुलासा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने केला आहे.

Shahid Afridi Pakistan Team
IND W vs ENG W: शेवटच्या टी-20 सामन्यात भारताचा पराभव; यजमानांनी मालिका 2-1 ने जिंकली

पाकिस्तानची आर्थिक स्थिती पुरामुळे बिकट झाली आहे. खराब आर्थिक स्थितीचा परिणाम पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर ही दिसून येत आहे. आफ्रिदीने बोर्डाच्या आर्थिक स्थितीचा खुलासा केला आहे. आफ्रिदी म्हणाला की, आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंवर उपचार देखील करू शकत नाही. शाहीनला स्वत:च्या पैशाने लंडनला जावे लागले आणि उपचाराचा खर्चही तिला स्वत: उचलावा लागला. तिथे राहण्यापासून ते जेवण आणि तिकीटाचा खर्चही शाहीननेच केला आहे.

Shahid Afridi Pakistan Team
Ruturaj Gaikwad : शतकी खेळी! पुण्याचा ऋतुराज कसोटी संघाचेही दार ठोठावतोय

पाकिस्तानी टीव्ही चॅनलवर शाहिद आफ्रिदी म्हणाला, कधीकधी खूप अडचणी येतात. शाहीनबद्दल सांगायचं झालं तर तो स्वतःच्या पैशावर इंग्लंडला गेला. क्रिकेटपासून तेथे राहण्याचा खर्च स्वतःला त्याने उचलला आहे. मी इथून डॉक्टरची व्यवस्था केली होती. तेथून त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधला. त्यानंतर त्याने सर्व काही स्वतः केले. पीसीबी यात काहीच केली नाही.

शाहिद आफ्रिदी हा पाकिस्तानचा युवा स्टार शाहीन आफ्रिदीचा सासरा आहे. त्यांच्या मुलीचे शाहीनसोबत लग्न होणार आहे. शाहिद आफ्रिदीने गेल्या वर्षीच सांगितले होते की, त्याची मोठी मुलगी शाहीनसोबत लग्न करणार आहे. लग्नाची तारीख अजून ठरलेली नाही.

Shahid Afridi Pakistan Team
T20 World Cup : पाकने लंगड्या घोड्यावर लावला डाव; कावऱ्या-बावऱ्यावर 'स्टँडबाय'ची वेळ!

पाकिस्तानचा संघ - बाबर आजम ( कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसीफ अली, हैदर अली, हॅरीस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदील शाह, मोहम्मद हस्नैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वासीम, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, उस्मान कादीर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com