हो मी चुकलो, मला पुन्हा भारताकडून खेळायचं आहे : अंबाती रायुडू

वृत्तसंस्था
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

भारताचा माजी फलंदाज अंबाती रायुडू सध्या TNCA एकदिवसीय स्पर्धेत खेळत आहे. यातील एका सामन्यानंतर त्याने स्पोर्ट्सस्टारला दिलेल्या मुलाखतीमध्ये पुन्हा भारतीय संघाकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

चेन्नई : भारताचा माजी फलंदाज अंबाती रायुडू सध्या TNCA एकदिवसीय स्पर्धेत खेळत आहे. यातील एका सामन्यानंतर त्याने स्पोर्ट्सस्टारला दिलेल्या मुलाखतीमध्ये पुन्हा भारतीय संघाकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

विश्वकरंडकासाठी संघात स्थान न मिळाल्यामुळे  रायडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.  विश्वकरंडकासाठी राखीव खेळाडूंमध्ये स्थान असतानाही विजय शंकरला झालेल्या दुखापतीनंतर मयंक अगरवालला त्याच्या जागी स्थान देण्यात आले. या निर्णयामुळे नाराज झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

आता मात्र त्याला पुन्हा एकदा भारतीय संघातून खेळायचे आहे. त्याने दिलेल्या मुलाखतीमुध्ये त्याने हे स्पष्ट केले असल्याची चर्चा आहे. आता मला भारताबरोबर आयपीएलमध्येही खेळायचे आहे, असेही रायुडूने या मुलाखतीमध्ये सांगितल्याचे म्हटले जात आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ambati Rayudu declares that he want to play again