Indian Women Hockey : भारताकडून अमेरिका पराभूत

भारतीय महिला हॉकी संघाने रविवारी येथे झालेल्या एफआयएच प्रो लीग या हॉकी स्पर्धेमध्ये अमेरिकन संघावर पेनल्टी शूटआऊटमध्ये २-१ असा विजय मिळवला.
Indian Women Hockey
Indian Women Hockeysakal

रौरकेला : भारतीय महिला हॉकी संघाने रविवारी येथे झालेल्या एफआयएच प्रो लीग या हॉकी स्पर्धेमध्ये अमेरिकन संघावर पेनल्टी शूटआऊटमध्ये २-१ असा विजय मिळवला. त्याआधी निर्धारित वेळेमध्ये दोन्ही देशांमध्ये १-१ अशी बरोबरी झाली होती.

भारत - अमेरिका यांच्यामधील लढतीत दीपिका हिने १९व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत भारताला आघाडी मिळवून दिली होती. पण ४५व्या मिनिटाला सेसा ॲशले हिने अमेरिकन संघासाठी गोल करीत त्यांना १-१ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर दोन्ही देशांना गोल करता आला नाही.

Indian Women Hockey
Ranji Trophy : महाराष्ट्राच्या संघाचा पाय खोलात ; सेना दलाकडे २०५ धावांची आघाडी

त्यामुळे निकालासाठी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला. पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताकडून दोन गोल करण्यात आले. अमेरिकन संघाकडून लीह क्राऊस हिने एकमेव गोल केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com