Babar Azam : पाकचा कर्णधार पुन्हा फेल; अमित मिश्राने विराटवरून काढला बाबरला चिमटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amit Mishra's Tweet For Babar Azam

Babar Azam : पाकचा कर्णधार पुन्हा फेल; अमित मिश्राने विराटवरून काढला बाबरला चिमटा

Amit Mishra's Tweet For Babar Azam : पाकिस्तानच्या संघाने उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. बाबर आझम कंपनीने अखेर विश्वचषकात नेदरलँड्सविरुद्ध पहिला विजय नोंदवला आहे. नेदरलँड संघाला या सामन्यात 6 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. पाकिस्तानने हा सामना जिंकला असला तरी संघाचा कर्णधार बाबर आझमचा फॉर्म संघासाठी मोठी समस्या आहे.

हेही वाचा: Virat Kohli : विराटच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा, 'हा' विक्रम करणारा पहिला भारतीय

बाबर आझम भारताविरुद्ध शून्यावर बाद झाला होता, तर झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात फक्त 4 धावांवर बाद झाला होता. नेदरलँड्सविरुद्धही कर्णधाराला नशिबाची साथ मिळाली नाही. तो 4 धावांवर धावबाद झाला. यानंतर बाबरलाही टीकेला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान भारतीय फिरकी गोलंदाज अमित मिश्राने बाबर आझमबद्दल केलेले ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा: Suryakumar Yadav : झुंजार सूर्याने लाज राखली! भारताचे फक्त 3 फलंदाज पोहचले दुहेरी आकड्यात

अमित मिश्राने बाबरच्या फॉर्मच्या समस्यावर ट्विट केले आहे. बाबर आझमने विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर लिहिलंय तसंच काहीसं मिश्राने ट्विटमध्ये लिहिलं आहे. अमित मिश्रा यांनी लिहिले की, 'हेही दिवस निघून जाईल. फक्त खंबीर राहा. आशिया कपच्या सुरुवातीलाही बाबर आझम फ्लॉप दिसला होता. त्यावेळीही पाकिस्तानी कर्णधाराला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते.

हेही वाचा: PAK vs NED | VIDEO : ...अन् शादाब खाननं कपाळावर हात मारून घेतला

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर नेदरलँड संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 बाद 91 धावा केल्या. पाकिस्तानच्या संघाने 13.5 षटकांत चार विकेट गमावत 94 धावा करून सामना जिंकला. मोहम्मद रिझवानने सर्वाधिक 49 धावा केल्या. या सामन्यात कर्णधार बाबर आझम काही खास करू शकला नाही.