पाकिस्तानवर आणखी एक सर्जिकल स्ट्राईक : अमित शहा 

वृत्तसंस्था
सोमवार, 17 जून 2019

भारतीय संघाने पाकिस्तानवर आणखी एक सर्जिकल स्ट्राईक केला आणि विजय मिळविला अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय संघाचे कौतुक केले आहे. 

वर्ल्ड कप 2019 : नवी दिल्ली : भारतीय संघाने पाकिस्तानवर आणखी एक सर्जिकल स्ट्राईक केला आणि विजय मिळविला अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय संघाचे कौतुक केले आहे. 

''भारताने पाकिस्तानवर आणिखी एक सर्जिकल स्ट्राईक केला आणि निकाल अपेक्षितच लागला. या विजयाबद्दल भारतीय संघाचे खूप खूप अभिनंदन. देशातील प्रत्येकाला तुमचा खूप अभिमान आहे आणि देशात सर्वजण या विजयचा आनंद साजरा करत आहेत,'' अशा शब्दांत त्यांनी भारतीय संघाचे कौतुक केले आहे. 

देशभरातील विविध राजकिय नेत्यांनीसुद्धा भारतीय संघाचे तोंडभरुन कौतुक केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Shah congratulates Team India