Andrew Flintoff : युवराजशी पंगा घेतलेला दिग्गज परतला मैदानात, 9 महिन्यांपूर्वी झाला होता भीषण अपघात! आता ओळखूही येईना चेहरा

Andrew Flintoff makes first public appearance since accident
Andrew Flintoff makes first public appearance since accident

Andrew Flintoff makes first public appearance since accident : इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू फ्लिंटॉफ गेल्या वर्षी कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. जवळपास नऊ महिन्यांनी तो सार्वजनिक ठिकाणी दिसला आहे. फ्लिंटॉफ न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या 4 वनडे मालिकेसाठी इंग्लंडच्या स्टाफमध्ये सामील झाला आहे. यासाठी त्याला कोणतेही वेतन मिळणार नाही.

Andrew Flintoff makes first public appearance since accident
IND vs PAK: टीम इंडियाची प्लेइंग-11 ठरली, 2 बदल होणार, हे खेळाडू जाणार बाहेर?

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बीबीसी ऑटो शो 'टॉप गियर'च्या शूटिंगदरम्यान फ्लिंटॉफ गंभीर जखमी झाला होता. डन्सफोल्ड पार्क एरोड्रम येथे त्याच्या कारला अपघात झाला, त्यानंतर माजी इंग्लिश अष्टपैलू खेळाडूला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या चेहऱ्यावर आणि जबड्यावरही जखमा आहेत त्यामुळे चेहरा ओळखूही येईना. कार्डिफमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात कॅमेऱ्यांनी त्याला टिपले.

Andrew Flintoff makes first public appearance since accident
Asia Cup 2023: 'लाज वाटू द्या!...' IND vs PAK सामन्यासाठी एक नियम अन् इतरांसाठी वेगळा? दिग्गज खेळाडू भडकला...

2007 चा टी-20 वर्ल्ड कप आठवत असेल तर इंग्लंड आणि भारत यांच्यातील सामन्यात अँड्र्यू फ्लिंटॉफने युवराज सिंगला असे काही म्हणाला होते की, त्यानंतर त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका ओव्हरमध्ये 6 षटकार मारून इतिहास रचला.

फ्लिंटॉफ सामन्याच्या एक दिवस आधी कार्डिफला पोहोचला होता. इंग्लंडच्या क्षेत्ररक्षणाच्या सरावादरम्यान तो खेळाडूंसोबत दिसला होता. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर म्हणाला की, तो क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे. तो इंग्लंडचा दिग्गज खेळाडू आहे आणि तो संघात असणे खूप छान आहे. त्याच्या उपस्थितीचाच फायदा खेळाडूंना होईल. फ्लिंटॉफ केवळ या मालिकेसाठी इंग्लंड संघासोबत राहणार असून तो वर्ल्ड कपसाठी भारतात येणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com