एका IPL बोलीने क्लार्कबरोबरची मैत्री तुटली; सायमंट्सने केला खुलासा

Andrew Symonds Reveal Michael Clarke Friendship Rift Reason
Andrew Symonds Reveal Michael Clarke Friendship Rift Reason esakal

ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्र्यु सायमंड्स (Andrew Symonds) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे. युजवेंद्र चहलने मुंबई इंडियन्समध्ये असताना घडलेल्या एका घटनेचा उलगडा केला होता. त्यावेळी अँड्र्यु सायमंडचा उल्लेख आला होता. आता सायमंडनेच एक मोठे वक्तव्य केले आहे त्यामुळे तो सध्या चर्चेत आला आहे. सामंड्सने आता आपला सहकारी आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क (Michael Clarke) बरोबरच्या बिघडलेल्या नात्याबद्दल खुलासा केला.

Andrew Symonds Reveal Michael Clarke Friendship Rift Reason
वृद्धीमान साहाला धमाकावणं महागात, पत्रकार मजुमदारांवर दोन वर्षांची बंदी

मायकल क्लार्कने ऑस्ट्रेलियाला 2015 चा वर्ल्डकप जिंकून दिला होता. एकेकाळी अँड्र्यु सायमंड्स आणि मायकल क्लार्क यांच्या दोस्तीचे उदाहरण दिले जायचे. त्यांच्या दोस्तीचे किस्स्यांची चर्चा व्हायची. मात्र यांच्या मैत्रीत अचानक फूट पडली. याबाबत खुद्द सायमंड्सने ब्रेट लीच्या पॉडकास्टमध्ये खुलासा केला आहे. सायमंड्स या पॉडकास्टमध्ये म्हणाला की, 'ज्यावेळी क्लार्क संघात आला होता. त्यावेळी आम्ही दोघे एकत्रच फलंदाजी करत होतो. मी त्याची खूप काळजी घेत होतो. आम्ही चांगले मित्र झालो होतो. मला आयपीएलच्या लिलावात (IPL Auction) त्यावेळेची सर्वात मोठी रक्कम मिळाली होती. यानंतर माझ्या आणि क्लार्कच्या मैत्रीला तडे गेले. याची कल्पना मॅथ्यू हेडनला होती. पैसा खूप काही करवतो. पैसा चांगला आहे मात्र कधी कधी पैसा विष देखील बनते. मला वाटते की पैशामुळेच आमच्या दोघांच्या नात्यात फूट पडली.'

Andrew Symonds Reveal Michael Clarke Friendship Rift Reason
इरफान पठाणने अमित मिश्राच्या 'संविधान' ट्विटवर दिली प्रतिक्रिया

सायमंड्स पुढे म्हणाला की, 'माझ्या मनात त्याच्याविषयी खूप आदर आहे. त्यामुळे मी फार काही बोलणार नाही. आता आम्ही दोघे मित्र नाही. मला याबाबत काहीच अडचण नाही. मात्र मी इथे बसून चिखलफेक करणार नाही.'

मायकल क्लार्कने देखील सायमंडवर बरेच आरोप केले होते. कर्णधार असताना क्लार्कने 2008 मध्ये बांगलादेश दौऱ्यावर असताना सायमंड्सला अर्ध्यातून मायदेशी परत पाठवले होते. कारण सायमंड्स टीम मिटिंग सोडून मासेमारी करण्यासाठी गेला होता. ही गोष्ट त्याने 2015 च्या अॅशेस डायरीमध्ये क्लार्कने लिहिली आहे. क्लार्क म्हणतो 'सायमंड्सने टीव्हीवर माझ्या नेतृत्वावर खूप टीका केली होती. त्याला कोणाच्या नेतृत्वावर टीका करण्याचा अधिकार नाही. तो असा खेळाडू आहे जो 2005 मध्ये नशेत असताना आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी आला होता.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com