अँडी आणि जेमी मरे या वर्षी आयटीएफचे सर्वोत्कृष्ट खेळाडू

पीटीआय
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

पॅरिस - अँडी मरे आणि त्याचा भाऊ जेमी मरे यांची आयटीएफचे वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. एकाच वर्षात पुरुष विभागात एकेरी आणि दुहेरीत दोन भावांची निवड होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. महिला विभागात एकेरीत अँजेलिक किर्बर सर्वोत्कृष्ट ठरली. स्टेफी ग्राफ (1996) नंतर प्रथमच जर्मनीची खेळाडू या पुरस्काराची मानकरी ठरली आहे. अँडी मरे याने या मोसमात विंबल्डनसह एकूण नऊ विजेतीपदे मिळविली. त्याचबरोबर ऑलिंपिकचे दुसरे सुवर्णपदकही पटकावले.

मोसमाची अखेरची स्पर्धा जिंकून मरेने जागतिक क्रमवारीत जोकोविचला देखील मागे टाकले. दुहेरीत जेमी मरे आणि ब्रुनो सोआरेस, तर महिलांमध्ये कॅरोलिन गार्सिया आणि क्रिस्तिना म्लाडेनोविच यांनी हा पुरस्कार मिळविला.

Web Title: Andy and Jamie Murray ITF champion this year