पंधरा वर्षांच्या अनीशने पटकाविले नेमबाजीत सुवर्ण!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

नवी दिल्ली : वयाच्या पंधराव्या वर्षी भारताच्या अनीश भानवाला याने आज (शुक्रवार) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील नेमबाजीत सुवर्ण जिंकले. या पदकामुळे यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारताच्या सुवर्ण पदकांची संख्या 16 झाली आहे. चार वर्षांपूर्वी ग्लास्गो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील कामगिरीस भारताने यंदा मागे टाकले आहे. 

अनीशची ही पहिलीच राष्ट्रकुल स्पर्धा आहे. पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम फेरीत अनीशने विक्रमी 30 गुण मिळवित सुवर्ण पटकाविले. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पटकाविणारा अनीश हा सर्वांत तरुण भारतीय आहे. 

या स्पर्धेत अनीशला ऑस्ट्रेलियाचा 20 वर्षीय सर्जी एव्हग्लेवस्की आणि इंग्लंडचा 28 वर्षीय सॅम गोव्हिन यांचे कडवे आव्हान होते. तरीही अनीशने एकाग्रता कायम राखत सर्व आठ फेऱ्यांमध्ये अव्वल स्थान मिळवित अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत 28 गुण मिळवित एव्हग्लेवस्कीला रौप्य, तर 17 गुण मिळविणाऱ्या गोव्हिनला ब्रॉंझ पदक मिळाले. 

2017 मध्ये झालेल्या आयएसएसएफ ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये अनीशने 25 मीटर स्टॅंडर्ड पिस्तूल स्पर्धेत विश्‍वविक्रमी 579 गुणांसह सुवर्ण पदक जिंकले होते. तेव्हापासूनच त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याशिवाय, गेल्या वर्षी 61 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेतही अनीशने सुवर्ण पदक जिंकले होते. 

Web Title: Anish Bhanwala bags Gold in shooting