esakal | ENG v PAK :स्टोक्सनं मोडला धोनीचा खास रेकॉर्ड
sakal

बोलून बातमी शोधा

MS Dhoni and Ben Stokes

ENG v PAK :स्टोक्सनं मोडला धोनीचा खास रेकॉर्ड

sakal_logo
By
सुशांत जाधव

पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात बेन स्टोक्सवर बॅटिंगला नंबर आला नसली तरी त्याने एक खास रेकॉर्ड आपल्या नावे केलाय. स्टोक्सच्या नेतृत्वाखालील नवख्या इंग्लंड संघाने पाकिस्तानला 9 विकेट्सनी पराभवाचा दणका दिला. इंग्लंडच्या संघाने पाकिस्तान संघाला अवघ्या 141 धावांत रोखले होते. त्यानंतर एक विकेट गमावून इंग्लंडने माफल टार्गेट सहज पार केले. इंग्लंडच्या या विजयात सलामीवीर डेविड मलान आणि झॅक क्राउली या दोघांनी नाबाद अर्धशतकी खेळी केल्याचे पाहायला मिळाले. (Eng vs PAK Ben Stokes Breaks MS Dhoni Record)

दुखापतीतून कमबॅक करताना संघाची धूरा खांद्यावर आलेल्या बेन स्टोक्सने भारतीय संघाचा माजी कर्णधार धोनीचा खास रेकॉर्ड मागे टाकला. सर्वाधिक युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या संघाचे नेतृत्व करणारा कॅप्टन असा रेकॉर्ड आता बेन स्टोक्सच्या नावे झालाय. कमी अनुभवाच्या खेळाडूंसह आंतरराष्ट्रीय सामन्यात संघाचे नेतृत्व करण्याचा विक्रम यापूर्वी महेंद्र सिंह धोनीच्या नावे होता. त्याची जागा आता बेन स्टोक्सने घेतलीये.

हेही वाचा: SL vs IND: श्रीलंकन ताफ्यातील आणखी एकाला कोरोना

श्रीलंका विरुद्धच्या वनडे मालिकेनंतर इंग्लंडच्या ताफ्यातील 7 जणांना कोरोनाची लागण झाली होती. या खळबळजनक घटनेनंतर बोर्डाने बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली दुसरा संघ पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेसाठी तयार केला. दुखापतीतून सावरत बेन स्टोक्सने संघाची जबाबदारीही खांद्यावर घेतली.

हेही वाचा: दादाच्या ऑल टाईम इलेव्हनमध्ये पाकिस्तानी क्रिकेटला जागा नाही

स्टोक्सने आतापर्यंत 98 वनडे सामने खेळले आहेत. इतर सर्व खेळाडूंनी मिळून 26 सामने खेळले आहेत. पाकिस्तान विरुद्ध इग्लिश कॅप्टन आणि खेळाडू यांच्यातील अनुभवाचे प्रमाण 3.769 होते. यापूर्वी 2016 मध्ये झिम्बाब्वे दौऱ्यावर ज्यावेळी भारतीय संघाचे नेतृत्व धोनीने केले होते. त्यावेळी धोनी 275 वनडे सामने खेळला होता. इतर संघातील खेळाडूंचा अनुभव हा 73 वनडे इतका होता. धोनी आणि टीम इंडियातील इतर खेळाडू यांच्यातील अनुभवाचे हे प्रमाण 3.767 इतके होते.

loading image