esakal | "BCCI ने धोनीची जर्सी नंबर 7 रिटायर करावी"
sakal

बोलून बातमी शोधा

MS Dhoni

"BCCI ने धोनीची जर्सी नंबर 7 रिटायर करावी"

sakal_logo
By
सुशांत जाधव

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा देखील सचिन तेंडुलकरप्रमाणेच सन्मान व्हावा, अशी इच्छा भारताच्या माजी यष्टीरक्षकाने वर्तवलीये. बीसीसीआयच्या प्रशासकीय कामकाजात सक्रीय असलेल्या साबा करीम यांनी महेंद्र सिंह धोनीची 7 क्रमांकाची जर्सी रिटायर करावी, अशी मागणी केलीये. भारतीय क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल धोनीचा हा एक सन्मान ठरेल, असेही ते म्हणाले आहेत. (MS Dhonis Jersey Number 7 Should be Retired Says Saba Karim)

यापूर्वी बीसीसीआयने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची जर्सी क्रमांक 10 अनऔपचारिक पद्धतीने रिटायर केली होती. शार्दुल ठाकूरने एका सामन्यात 10 क्रमांकाची जर्सी घातल्यानंतर वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतला होता.

हेही वाचा: ENG v PAK :स्टोक्सनं मोडला धोनीचा खास रेकॉर्ड

महेंद्रसिंग धोनीने कसोटी क्रिकेटमधून सर्वात आधी निवृतीची घोषणा केली. त्यानंतर 6 वर्षांच्या कालावधीनंतर 15 ऑगस्ट 2020 रोजी धोनीने अचानक निवृत्तीची घोषणा केली होती. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शअर करुन पुन्हा आंतरराष्ट्रीय मैदानात उतरणार नसल्याचे स्पष्ट केले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याने निवृत्ती घेतली असली तरी चेन्नई सुपर किंग्जच्या नेतृत्वाची धूरा सांभाळत तो आयपीएलच्या माध्यमातन क्रिकेटमध्ये कनेक्ट आहे. किमान आणखी दोन वर्षे तो चेन्नईकडून खेळेल, असे दिसते.

हेही वाचा: End vs PAK 1st ODI : नवख्या इंग्लंड संघानं उडवला पाकचा धुव्वा

धोनी क्रिकेटच्या मैदानातून बाहेर पडला तरी तो भारतीय संघासाठी आवश्यक योगदान नक्की देईल, असा विश्वासही साबा करीम यांनी व्यक्त केलाय. सध्याच्या घडीला धोनी चेन्नई सुपर किंग्जते नेतृत्व करताना अनेक हिऱ्यांना घडवत आहे, असा उल्लेखही साबा करीम यांनी खेलनिती या एका पॉडकास्टमध्ये संवाद साधताना केला.

धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-20 आणि 50-50 वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती. धोनी हा भारतीय क्रिकेटमधील सर्वाधिक यशस्वी कॅप्टन आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आयसीसीच्या सर्व ट्रॉफ्या जिंकल्या आहेत. आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत संघाला यश मिळवून देणारा धोनी हा क्रिकेट जगतातील एकमेवर कर्णधार आहे. त्यामुळेच साबा करीम यांची ही मागणी बीसीसीआयने मान्य केली तर त्यात नवल वाटणार नाही.

loading image