कोल्हापूरच्या अनुष्काला नेमबाजीत रौप्यपदक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 जानेवारी 2019

कोल्हापूर - कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाज अनुष्का रवींद्र पाटील हिने आज ‘खेलो इंडिया’मध्ये १७ वर्षांखालील दहा मीटर पिस्तूल प्रकारात रौप्यपदक पटकावले. तिने ६०० पैकी ५६९ गुणांची कमाई करीत अग्र आठ खेळाडूंमध्ये अव्वल स्थान प्राप्त केले. 

कोल्हापूर - कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाज अनुष्का रवींद्र पाटील हिने आज ‘खेलो इंडिया’मध्ये १७ वर्षांखालील दहा मीटर पिस्तूल प्रकारात रौप्यपदक पटकावले. तिने ६०० पैकी ५६९ गुणांची कमाई करीत अग्र आठ खेळाडूंमध्ये अव्वल स्थान प्राप्त केले. 

या आठ जणींमध्ये अंतिम सामना झाला. यात अनुष्काने २३४.७ गुण मिळवत महाराष्ट्राच्या खात्यात रौप्यपदकाची भर टाकली. तिने आतापर्यंत जर्मनी, जपान, झेक रिपब्लिक, इराणमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करीत चमकदार कामगिरी केली. नुकत्याच इंदूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतही तिने सुवर्णपदक मिळविले.
अनुष्का क्रीडा प्रबोधिनीची खेळाडू आहे. छत्रपती संभाजीराजे नेमबाजी प्रशिक्षण केंद्रात अजित पाटील, तर पुणे येथे अब्दुल कय्यूम यांच्या मार्गदर्शनाखाली ती सराव करते. अनुष्का चाटे कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे.

क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्य चंद्रशेखर साखरे, ‘चाटे’चे प्रा. भरत खराटे, युवराज साळुंखे, विनय पाटील, जितेंद्र विभुते, ऑलिम्पिक खेळाडू गगन नारंग, पवन सिंग यांचे तिला मार्गदर्शन लाभत आहे. अनुष्काला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचेही सहकार्य आहे.

पदकांची लयलूट
अनुष्का मूळची लाडेगाव (ता. वाळवा, जि. सांगली) येथील आहे. तिने आजपर्यंत विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये एकूण ४२ सुवर्ण, तर १५ रौप्यपदकांची कमाई केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anushka Patil SIlver Medal