अनुष्का शर्माचा 'चकडा एक्सप्रेस'साठी मास्टर प्लॅन...

चकदा एक्सप्रेस या चित्रपटातून अनुष्का शर्मा अभिनय क्षेत्रात पुनरागमन करण्यासाठी सज्ज
anushka sharma | chakda xpress update
anushka sharma | chakda xpress update sakal

चकदा एक्सप्रेस या चित्रपटातून अनुष्का शर्मा अभिनय क्षेत्रात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. चित्रपटात अनुष्का भारतीय महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीची भूमिका साकरत आहे. अनुष्का पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर क्रिकेट खेळताना दिसणार आहे. त्यामुळे चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहे. अनुष्काची ही पहिली स्पोर्ट्स बायोपिक असणार आहे. अनुष्काने चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. दरम्यान आता चकदा एक्स्प्रेसबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. सूत्राच्या माहितीनुसार या चित्रपटाचे शूटिंग जगातील टॉप 4 स्टेडियममध्ये होणार आहे.(anushka sharma | chakda xpress update)

अनुष्का लॉर्ड्स स्टेडियमला लवकरच ​​रवाना होणार आहे. याशिवाय अनुष्का शर्मा उत्तर अमेरिकेतील हेडिंग्ले स्टेडियममध्ये चित्रपटाच्या काही भागांचे चित्रीकरणही करणार आहे. पंरतु चित्रपटाचा बहुतांश भाग भारतातच पूर्ण होणार आहे. अनुष्का जगातील चार मोठ्या स्टेडियममध्ये शूटिंगसाठी जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

झूलन गोस्वामी वर असलेल्या स्पोर्ट्स बायोपिक चकडा एक्स्प्रेसबद्दल बोलायचं झालं तर हा चित्रपट झूलन गोस्वामीच्या प्रेरणादायी जीवनावर बनवला जाणार आहे. झुलन क्रिकेट खेळण्याचे स्वप्न कसे पूर्ण करते हे या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

अनुष्काचा शेवटचा चित्रपट 'झिरो' 2018 मध्ये रिलीज झाला होता. त्यानंतर अनुष्का शर्माने कोणताही चित्रपट साईन केला नाही. विराट कोहलीसोबत लग्न केल्यानंतर मूवी करण्यातून ब्रेक घेतला होता. पण आता ती मोठ्या पडद्यावर परतण्याच्या तयारीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com