esakal | भारताच्या कराटेपटूची मृत्यूशी झुंज; फुफ्फुसाच्या आजारानं 'संतोष'ला घेरलं I Shotokan Karate
sakal

बोलून बातमी शोधा

Karate Player Santosh Mohite
शोतोकान कराटे क्रीडा प्रकारात देशात अव्वल कामगिरी बजाविलेला कराटेपटू सध्या मृत्यूशी झुंज देत आहे.

भारताच्या कराटेपटूची मृत्यूशी झुंज; फुफ्फुसाच्या आजारानं 'संतोष'ला घेरलं

sakal_logo
By
सुनील शेडगे

नागठाणे (सातारा) : शोतोकान कराटे (shotokan karate) क्रीडा (Taekwondo competition) प्रकारात देशात अव्वल कामगिरी बजाविलेला कराटेपटू सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. त्याच्या आयुष्यासाठी सारेजण एकवटले आहेत. तो बरा व्हावा, यासाठी प्रार्थना करत आहेत. संतोष हरिश्चंद्र मोहिते (Karate Player Santosh Mohite) हे या कराटेपटूचे नाव. ते सातारा तालुक्यातील नागठाण्याचे. शोतोकान कराटेत त्यांनी प्रभावी कामगिरी केलीय.

केवळ राज्यातच नव्हे, तर देशात स्वतःचा लौकिक निर्माण केला आहे. शोतोकान कराटे अन् मार्शल आर्ट क्रीडा प्रकारात त्यांनी अनेक पदके पटकाविली आहेत. खेळाडू म्हणून यश पटकाविल्यानंतर ते पूर्ण वेळ प्रशिक्षणाकडे वळले. नागठाणे परिसरासह सातारा, बारामती, रायगड, दमण, गुजरात आदी ठिकाणी त्यांनी कराटेचे प्रशिक्षण वर्ग सुरू केले. श्री. मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ८० राष्ट्रीय अन् २०० हून अधिक राज्यस्तरीय कराटेपटू निर्माण झाले आहेत. जिल्ह्यातील महिला पोलिसांनाही त्यांनी प्रशिक्षण दिले आहे.

हेही वाचा: 'कोरोना माता मंदिर' पाडण्याविरोधातील याचिका कोर्टानं फेटाळली

अलीकडच्या काळात त्यांना कोरोना आजाराचा प्रादुर्भाव झाला. त्यावर मात केल्यानंतर त्यांना फुफ्फुसाच्या आजाराने घेरले. सातारा, कऱ्हाड, पुणे, कोल्हापूर आदी रुग्णालयांत उत्तम उपचार घेऊनही त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा नाही. त्यामुळे गेले सहा महिन्यांहून अधिक काळ ते रुग्णशय्येवर आहेत. आतापर्यंत त्यांच्या कुटुंबीयांनी उपचारासाठी सुमारे ४० लाख रुपये खर्च केले आहेत. येत्या काळात त्यांच्या उपचारासाठी ६० लाख रुपयांची आवश्यकता आहे. त्यांचे आप्तेष्ट, नातेवाईक अन् मित्र परिवार त्यासाठी प्रयत्नशील आहे. ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून नुकताच साडेतीन लाख रुपयांचा निधी गोळा झाला आहे.

हेही वाचा: दसऱ्यानंतरच रणधुमाळी; BJP च्या उदयनराजेंचा 'निर्णय' NCP च्या कोर्टात

मदतीचे आवाहन

श्री. मोहिते यांच्यावर फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. त्यासाठी ६० लाख रुपयांची गरज आहे. शस्त्रक्रियेच्या खर्चाला हातभार लावावा, असे आवाहन त्यांच्या कुटुंब अन् मित्र परिवाराकडून करण्यात आले आहे. अकाउंट नंबर-७२०२०००१००१२९२०१, आयएफएससी- केएआरबी ००००७२०. अकाउंट नंबर- ६०२६७७१६९९८, आयएफएससी- एमएएचबी००००२२१. अथवा फोन पे साठी ७७४१८११८७२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: Style Is Style : उदयनराजेंची साताऱ्यात सुस्साट बाईक रायडिंग

loading image
go to top