साक्षी शितोळे अन्‌ तिरंदाजी, लव्ह ऍट फर्स्ट साइट!!

Archery player sakshi shitole story
Archery player sakshi shitole story

पुणे : मनुष्य जन्माला आल्यानंतर रोज अनेक गोष्टी प्रथमच पाहात असतो. यातील क्‍लिक होणाऱ्या, कुछ-कुछ होता है... अशी अनुभूती देणाऱ्या गोष्टी मात्र कमी असतात. भूछत्रांपेक्षा जास्त वेगाने वाढणाऱ्या सेल्फीवेड्यांची जमात निर्माण होण्यापूर्वी असं कुणालीही काहीही उगाचच क्‍लिक व्हायचं नाही. साक्षी शितोळेच्या बाबतीत असेच काहीसे घडले. वेगळ्या मैदानावर व्यायाम करायला जावे लागण्याचे निमित्त ठरले आणि तेथे प्रथमच तिरंदाजी पाहून ती या खेळाच्या प्रेमात पडली. 

साक्षी श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्रशिक्षक रणजित चामले यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहगड रस्ता परिसरातील आर्चर्स ऍकॅडमीत सराव करते. आगामी स्पर्धांसाठी तिची कसून तयारी सुरू आहे. 

साक्षी मूळची दौंडजवळील पडवीची. तिने सांगितले की, नेवासा येथील घाडगे पाटील मिलिटरी स्कूलमध्ये तिने प्रवेश घेतला. त्या वेळी ती रोज परेड ग्राउंडवर व्यायाम करायची. एके दिवशी ते मैदान उपलब्ध नव्हते. त्यामुळे तेथून जवळील नॅशनल ग्राउंडवर ती गेली. तेथे काही मुले-मुली तिरंदाजीचा सराव करीत होती. त्यांना नेम साधताना पाहून मी हरखून गेले. वडील राजेंद्र यांनी मला तिरंदाजी शिकण्यास प्रोत्साहन दिले. सुरवातीला मी येऊन त्यांचा सराव नुसता पाहायचे. मग सराव सुरू केला. शाळा सुटल्यावर तीन तास सराव करायचे. 

नेम साधताना मनात काय विचार चालतो, याविषयी ती म्हणाली की, मनात विचार येतात; पण ते नकारात्मक नसावेत म्हणून मी चांगली कामगिरी करायचे, असे ठरवते. एकाग्रतेसाठी मी ध्यान करते. भारतीय शिबिरात दाखल झाल्यानंतर वरिष्ठ खेळाडूंकडून शक्‍य तेवढे शिकण्याचा प्रयत्न असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com