Archery World Cup : प्रथमेशचे सुवर्ण थोडक्यात हुकले! जिंकले रौप्य पदक

जागतिक तिरंदाजी : डेन्मार्कच्या मथियासचा पहिला क्रमांक
prathmesh
prathmeshsakal

हर्मोसिलो - महाराष्ट्राच्या प्रथमेश जावकर याचे जागतिक तिरंदाजी स्पर्धेतील सुवर्णपदक थोडक्यासाठी हुकले. पुरुषांच्या कंपाऊंड प्रकारात डेन्मार्कचा मथियास फुलर्टन व प्रथमेश जावकर यांच्यामध्ये सुवर्णपदकासाठी लढत झाली, पण पाच सेटमध्ये बरोबरी झाल्यानंतर दहा क्रमांकावर अचूक वेध घेण्याच्या फेरीत प्रथमेश व मथियास यांच्यामध्ये चुरस रंगली. प्रथमेशचा बाण थोडासा बाजूला लागल्याने मथियास हा सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. प्रथमेश याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

प्रथमेशने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत इटलीच्या मिग्वेल बेसेरा याच्यावर १४९-१४१ असा विजय साकारत पुढे पाऊल टाकले. त्यानंतर जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या नेदरलॅंडच्या माईक श्‍लोसर याला पराभूत करताना प्रथमेशने उल्लेखनीय कामगिरी केली.

prathmesh
Aus vs Sa ODI :ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेत रचला इतिहास! वॉर्नर अन् हेड यांनी तुफानी फलंदाजी करत केला मोठा विक्रम

अंतिम फेरीत प्रथमेश व मथियास यांच्यामध्ये १४८-१४८ अशी बरोबरी झाल्यानंतर दोन्ही खेळाडूंना लक्ष्याच्या मध्यभागी निशाणा लावायचा होता. प्रथमेशचा निशाणा थोडक्यासाठी चुकला. त्यामुळे त्याला रौप्यपदक मिळाले.

prathmesh
ICC World Cup: कोणाचा मुलगा... तर कोणाची पत्नी... अनोख्या पद्धतीने केली वर्ल्ड कपच्या संघाची घोषणा

अभिषेक ब्राँझपदकापासून दूरच पुरुषांच्या कंपाऊंड प्रकारात भारताच्या अभिषेक वर्मा यालाही पदक जिंकण्याची संधी होती. अभिषेक याने २०१५ मधील जागतिक स्पर्धेतील कंपाऊंड प्रकारात ब्राँझपदक पटकावले होते. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिला तिरंदाज ठरला होता.

prathmesh
Pune Crime : लोहगावमध्ये चाकूने वार करून पत्नीचा खून

अभिषेक यंदा उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या स्वायर सुलिवन याला पराभूत करीत आगेकूच केली, पण उपांत्य फेरीच्या लढतीत त्याला मथियास याच्याकडून १५०-१४७ अशी हार पत्करावी लागली. त्यानंतर ब्राँझपदकासाठीच्या लढतीत माईक श्‍लोसर याने अभिषेकला १५०-१४९ असे पराभूत केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com