
भारतीय तिरंदाजांनी शनिवारचा (१० मे) दिवस गाजवला आहे. एक, दोन नाही तर तीन पदके भारतीय तिरंदाजी संघाने जिंकली आहेत. सध्या शांघाई येथे तिरंदाजी वर्ल्ड कप स्टेज-२ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य असे तीन पदके जिंकली आहेत. भारतीय कम्पाउंड पुरुष संघाने ऐतिहासिक सुवर्णपदकाला गवसणी घातली.