Lautaro Martinez winning goal vs England
England vs Argentina FIFA World Cup 2026 semifinal : गतविजेत्या अर्जेंटिनाचा फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील उपांत्य फेरीचा प्रवास लिंबू टिंबू संघांविरुद्धच्या लढतींचा राहिला. त्यातही काबो व्हर्दे, इजिप्त या दुबळ्या संघांनी त्यांचा घाम काढलाच, परंतु आज त्यांच्यासमोर इंग्लंडसारख्या संघाचे कडवे आव्हान होते. पण, आम्ही इथे जेतेपदाचा बचाव करण्यासाठी मैदानावर उतरलो आहोत आणि सहज हार मानणार नाही, हेच अर्जेंटिनाने ठणकावून सांगितले. अँथोनी गॉर्डनच्या ( ५५ मि.) गोलला अर्जेंटिनाकडून एंझो फर्नांडेझने ( ८५ मि.) जोरदार प्रत्युत्तर दिले. ९०+२ मिनिटाला लॉटारो मार्टिनेझच्या हेडरद्वारे केलेल्या गोलने अर्जेंटिनाचा अविश्वसनीय विजय पक्का केला.