esakal | महिला हॉकीचे आज अर्जेंटिना लक्ष्य
sakal

बोलून बातमी शोधा

महिला हॉकीचे आज अर्जेंटिना लक्ष्य

महिला हॉकीचे आज अर्जेंटिना लक्ष्य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

टोकियो : ताकदवान ऑस्ट्रेलियास पराजित करून आशा उंचावलेला भारतीय महिला हॉकी संघ उद्या अर्जेंटिनास पराजित करण्याचे लक्ष्य बाळगून मैदानात उतरेल. जर्मनीस धक्का देऊन उपांत्य फेरी गाठलेल्या अर्जेंटिनाचे खडतर आव्हान भारतासमोर असेल. (Argentina targets womens hockey today)

ऑलिंपिकपूर्व तयारीसाठी भारतीय महिला हॉकी संघ अर्जेंटिनात खेळला होता. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघ एकमेकांचा खेळ जाणून आहेत. अर्थात या पूर्वतयारीच्या सामन्यात क्वचितच प्रतिस्पर्धी पूर्ण ताकदीनिशी खेळले असतील; मात्र एकमेकांच्या शैलीची सर्व खेळाडूंना जाणीव आहे.

आम्हाला अर्जेंटिनाच्या खेळाची कल्पना आहे, तसेच तेही आमचा खेळ जाणतात. या वर्षाच्या सुरुवातीस आम्ही त्यांच्याविरुद्ध खेळलो आहोत. त्यात चांगली कामगिरीही झाली होती, पण त्यावरून उद्याच्या लढतीबाबत अंदाज बांधणे चुकीचे होईल. ऑलिंपिक स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या लढतीची अन्य कोणत्याही सामन्यासह तुलनाच होऊ शकत नाही. दौऱ्यातील सामन्याच्या वेळी ऑलिंपिक स्पर्धेतील लढतीच्या वेळी असलेले वातावरण तसेच दडपण असणार नाही. ही आमची सर्वांत मोठी चाचणी आहे. त्यास सामोरे जाण्याचा विश्वास आम्हाला आहे, असे राणी रामपालने सांगितले.

हेही वाचा: भारत-इंग्लंड पहिला कसोटी सामना; कोहली कोणते पर्याय निवडणार?

अर्जेंटिनाविरुद्धची लढत नक्कीच खडतर असेल. त्यांना हरवणे सोपे नाही. त्यांचा बचाव भक्कम आहे. आम्हाला संधीचे गोलात रूपांतर करावे लागेल. लक्ष्यावर पूर्ण केंद्रित करून त्या वेळच्या परिस्थितीस सामोरे जाणे महत्त्वाचे आहे. काही मिनिटांत काय होईल, हा विचार टाळणे आवश्यक असते. या सामन्यात सर्वस्व पणास लावण्यास मी खेळाडूंना सांगितले आहे.

- शूअर्ड मरीन, भारतीय मार्गदर्शक

ऑस्ट्रेलियाविरुद्ध आमची कामगिरी सुरेख झाली होती; मात्र आता मागे पाहण्यास वेळ नाही. आमचे लक्ष्य पूर्णपणे अर्जेंटिनाविरुद्धच्या लढतीवर केंद्रित झाले आहे. आगामी प्रत्येक लढत आता खडतर असेल. त्यासाठी आम्ही तयार आहोत.

- राणी रामपाल, भारतीय कर्णधार

loading image
go to top