Argentina vs Algeria : लिओनेल मेस्सीने इतिहास रचला! Fifa World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच; किलियन एमबापेला काही तासांत धक्का

Lionel Messi Creates World Cup History: फुटबॉलविश्वात 'मेस्सी मेनिया' पुन्हा एकदा पाहायला मिळाला. अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स२०२६ मध्ये आणखी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला. अल्जेरियाविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरताच मेस्सीने वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला.
Lionel Messi becomes first player to play six FIFA World Cups

Lionel Messi becomes first player to play six FIFA World Cups

esakal

Updated on

Argentina vs Algeria Fifa World Cup 2026 Marathi Football News : अर्जेंटिनाचा संघ कॅन्सस सिटीमधील ॲरोहेड स्टेडियमवर अल्जेरियाविरुद्ध आपल्या फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ विजेतेपदाच्या बचावाला सुरुवात करत आहे. जगातील महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी ( Lionel Messi ) आणि त्याचे सहकारी या वर्ल्ड कप स्पर्धेत उतरताना उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत आणि ब्राझीलनंतर (१९६२) वर्ल्ड कप विजेतेपद राखणारा पहिला संघ बनण्याचे त्यांचे ध्येय आहे. तेच, अल्जेरिया २०१४ नंतर प्रथमच विश्वचषकात सहभागी होत आहे. पण, या सामन्यासाठी मैदानावर उतरताच मेस्सीने वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com