Lionel Messi breaks Pelé's World Cup record against Algeria
esakal
Argentina vs Algeria Fifa World Cup 2026 Marathi Football News : ३८ वर्षीय लिओनेल मेस्सीही ( Lionel Messi) आजही फुटबॉल विश्वावर जादू कायम आहे... बरोबर आजच्याच दिवशी २० वर्षांपूर्वी फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या मेस्सीने २०२६ मध्ये याच दिवशी ऐतिहासिक भरारी घेतली. २०२२ मध्ये वर्ल्ड कप विजयाचे स्वप्न पूर्ण करणारा मेस्सी, तेच जेतेपद कायम राखण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरला अन् संपूर्ण जग मेस्सीमय झाल्याचे पाहायला मिळाले. मेस्सीचा हा कदाचित शेवटचा वर्ल्ड कप असेल, ही भीती चाहत्यांच्या डोळ्यांतून मार्ग काढताना दिसली. पण, मेस्सीने आपल्या चाहत्यांना निराश केले नाही आणि एक गोल करून पाच विक्रमांना गवसणी घातली.