Lionel Messi Ballon d'Or 2023 : लिओनेल मेस्सी जगात भारी! 8व्यांदा पटकावला 'बॅलोन डी'ओर'

दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने पुन्हा एकदा प्रतिष्ठेचा बॅलन डी'ओर पुरस्कार जिंकला आहे.
Lionel Messi Ballon d'Or 2023
Lionel Messi Ballon d'Or 2023

दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने पुन्हा एकदा प्रतिष्ठेचा बॅलोन डी'ओर पुरस्कार जिंकला आहे. मेस्सीला आठव्यांदा बॅलोन डी'ओर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इंटर मियामीचे मालक आणि फुटबॉल लिजेंड डेव्हिड बेकहॅम यांना मेस्सीला हा सन्मान प्रदान केला. लिओनेल मेस्सीने यापूर्वी 2009, 2010, 2011, 2012, 2015, 2019 आणि 2021 मध्ये बॅलोन डी'ओर पुरस्कार जिंकला आहे.

बॅलन डी'ओर पुरस्कार का खास आहे?

बॅलोन डी'ओर हा फुटबॉलचा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे, हा वैयक्तिक स्तरावर खेळाडूला दिला जाणारा सन्मान आहे. फुटबॉल क्लब आणि राष्ट्रीय संघातील खेळाडूला त्याच्या सर्वोत्तम कामगिरीच्या आधारावर दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. जगातील सर्वोत्कृष्ट पुरुष आणि महिला फुटबॉलपटूच यासाठी पात्र आहेत.

1956 पासून दरवर्षी पुरुषांना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल या पुरस्काराने सन्मानित केले जाते. तसेच 2018 पासून सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूंना बॅलोन डी'ओर देण्याची परंपरा सुरू झाली आहे. 2020 मध्ये कोविडमुळे हा पुरस्कार देता आला नाही.

Lionel Messi Ballon d'Or 2023
PAK vs BAN : आता फक्त सन्मानासाठी... पाकिस्तानने अखेर गुडघे टेकलेच!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com