

PAK vs BAN : पाकिस्तानने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये आपले पहिले दोन सामने जिंकून दमदार सुरूवात केली होती. मात्र तिसऱ्या सामन्यात भारताने त्यांचा पराभव केला अन् त्यांची गाडी रूळावरून घसरली. सहा सामने झाले तरी ही गाडी काही विजयी ट्रॅकवर परतली नाही. त्यांचे वर्ल्डकपमधील आव्हान अधिकृतरित्या संपुष्टात आलं नसलं तरी सेमी फायनल गाठणं त्यांच्यासाठी आता दिव्यच असणार आहे. पाकिस्तान उद्या (दि. 31) बांगलादेशविरूद्ध खेळणार आहे.
हीच गोष्ट पाकिस्तानचे प्रशिक्षक ग्रांट ब्रँडबर्न यांनी अखेर मान्य केली आहे. त्यांच्या वक्तव्यावरून पाकिस्तान संघाने आता गुडघे टेकले असल्याचे जाणवत आहे. प्रशिक्षक म्हणतात की आता बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाने चार पराभवांचा सिलसिला संपवून सन्मानासाठी खेळायला हवं.
पाकिस्तानचे प्रशिक्षक म्हणाले, 'मला माहिती नाही की तुमची फेव्हरेट टीम कुठून मिळणार. या स्पर्धेत 10 संघ आहेत. या संघात 150 उत्कृष्ट खेळाडू सध्या खेळत आहेत. आयसीसी रँकिंगमध्ये देखील ते भारी आहेत. आम्हाला भारतासोबत खेळण्याची फार संधी मिळत नाही. याचबरोबर आम्हाला काही अव्वल स्थानावरील देशांशी देखील जास्त खेळण्याची संधी मिळत नाही. काही संघ पाकिस्तानमध्ये येत नाहीत.
एप्रिल महिन्यात आम्ही आयसीसी वनडे रँकिंगमध्ये पाचव्या स्थानावर होतो. वर्ल्डकपूर्वी आम्ही पहिल्या स्थानावर होतं. आम्ही अजूनही जगातील सर्वोत्तम टीम नाही. आम्हाला या स्पर्धेत कोणत्याही संघाला हरवण्याचा अधिकार नाही. आता आम्हाला गुणवत्तापूर्ण क्रिकेट खेळायचं आहे. आम्ही सर्व विभागांवर लक्ष देणार आहोत. आम्ही आमच्या देशात आनंदाचे वातावरण परत आणण्यास उत्सुक आहोत.
आम्ही गेले चार सामने हरलो आहोत. आम्ही या सामन्यात प्रत्येक विभागात चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरलो. मात्र या पराभवामुळे आम्ही संघ आणि खेळाडू म्हणून कोठे आहोत हे सिद्ध होत नाही. आता आम्ही त्याच्यावर लक्ष केंद्रित करणार नाहीये. आता उरलेल्या तीन सामन्यात आम्ही चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहोत. बाकी सगळं नशीबावर सोडणार आहोत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.