Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Fariba Hashimi, Asian Games, Afghanistan Silver Medal. अफगाणिस्तानची फरिबा हाशिमीने आशियाई क्रीडा स्पर्धेतील सायकलिंग रोड रेसमध्ये रौप्यपदक जिंकले. २००२ नंतर आशियाई स्पर्धेत पदक जिंकणारी ती अफगाणिस्तानची पहिली महिला ठरली.
Fariba Hashimi, Asian Games, Afghanistan Silver Medal.

Fariba Hashimi, Asian Games, Afghanistan Silver Medal.

esakal

Updated on: 

नागोया, : अफगाणिस्तानमध्ये महिलांसाठी सर्व प्रकारच्या बंधनांचे दोरखंड असताना आणि अनेक आव्हानांचा सामना करत फरिबा हाशिमीने क्रांती घडवली. आशियाई क्रीडा स्पर्धेत २००२ नंतर पदक जिंकणारी ती अफगाणिस्तानची पहिली महिला ठरली. फरिबाने या आशियाई स्पर्धेत सायकलिंग रोड रेसचे रौप्यपदक जिंकले.

हे पदक हाशिमीसाठी केवळ क्रीडा यश नाही. अफगाणिस्तानातील सामाजिक बंधने, प्रशिक्षणादरम्यान सहन केलेला त्रास आणि तालिबानच्या पुनरागमनानंतर देश सोडण्याची वेळ या संघर्षाचे ते प्रतीक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com