Arjun Tendulkar Original Video : अर्जून तेंडुलकरचा 'तो' व्हीडिओ बनावट; 'फॅक्ट चेक'मधून झालं स्पष्ट

Arjun Tendulkar Original Video : अर्जून तेंडुलकरचा 'तो' व्हीडिओ बनावट; 'फॅक्ट चेक'मधून झालं स्पष्ट

मुंबईः मागच्या दोन-तीन दिवसांपासून अर्जून तेंडुलकरचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये तो नाकात टाकलेलं बोट पुन्हा तोंडात टाकत आहे. परंतु हा व्हीडिओ निव्वळ खोडसाळपणा असल्याचं स्पष्ट होत आहे.

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकर हा मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी त्याचा एक व्हीडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला होता. त्यामुळे अर्जून तेंडुलकरची चुकीची प्रतिमा तयार झाली होती. मात्र फॅक्ट चेकमधून हा व्हीडिओ खोटा असल्याचं स्पष्ट झालेलं आहे.

आयपीएलच्या मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यामध्ये गुजराचा विजय झाला होता. या सामन्यात अर्जून तेंडुलकरने १३ धावा आणि एक विकेट घेतली होती. या मॅचदरम्यान अर्जून मैदानावर फिल्डिंग करत असतांनाचा एक व्हीडिओ व्हायरल झाला. त्यामध्ये तो नाकात टाकलेले बोट तोंडामध्ये टाकताना दिसतोय.

Arjun Tendulkar Original Video : अर्जून तेंडुलकरचा 'तो' व्हीडिओ बनावट; 'फॅक्ट चेक'मधून झालं स्पष्ट
Brij Bhushan Singh: सुप्रीम कोर्टाकडून FIRचे आदेश; बृजभूषण सिंहांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

मात्र हा व्हीडिओ रिव्हर्स एडिट केल्याचे निष्पन्न झालंय. खरा व्हीडिओ शेवटापासून सुरु होतो. म्हणजे अर्जून सुरुवातीला तोंडामध्ये बोट टाकतो, नंतर नाकात. हे स्पष्ट दिसत आहे.

ट्विटर युजरने यासंदर्भातला खरा व्हीडिओ शेअर केला आहे. याच व्हीडिओमध्ये कुणीतरी छेडछाड करुन तो व्हीडिओ व्हायरल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com