Arshdeep Singh : महिनाभरापूर्वीचा व्हिलन आता ठरला सुपरहिरो, एका ओव्हरमध्ये बदललं चित्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arshdeep Singh

Arshdeep Singh : महिनाभरापूर्वीचा व्हिलन आता ठरला सुपरहिरो, एका ओव्हरमध्ये बदललं चित्र

Arshdeep Singh ND VS SA : भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला विजयाने सुरुवात केली. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीनंतर सूर्यकुमार यादव व केएल राहुल यांनीभारतीय संघाला आठ गड्यांनी विजय मिळवून दिला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला सामना तिरुअनंतपुरम येथे खेळला गेला. ज्या सामन्याचा मानकरी भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग ठरला. त्याने पहिल्या षटकात तीन गडी बाद करत सामन्यात भारताचे वर्चस्व आणले. अगदी महिनाभरापूर्वी ज्या अर्शदीपवर टीका झाल्या होत्या, तोच अर्शदीप भारताच्या विजयाचा सुपरहिरो ठरला.

हेही वाचा: IND va SA : राहुलने सिक्स मारून संपवला सामना; भारत मालिकेत 1-0 ने आघाडीवर

संयुक्त अरब अमिरातीमध्ये याच महिन्यात आशिया चषक स्पर्धा खेळल्या गेली होती. सुपर फोरच्या महत्त्वपूर्ण सामन्यात भारतीय संघाला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागेल. त्या सामन्यात अर्शदीपने पाकिस्तानचा फलंदाज आसिफ अली याचा सोपा झेल सोडलेला. त्यानंतर अलीने सामना जिंकून दिला. त्यानंतर अर्शदीपवर मोठ्या प्रमाणात टीका झाल्या होत्या. अनेकांनी त्याला देशद्रोही देखील म्हटले, तसेच संघातून त्याला काढण्याची मागणी केली होती.

हेही वाचा: IND vs SA : अर्शदीप-दीपकची घातक गोलंदाजी, सुर्याची विक्रमी कामगिरी, विजयाची 5 प्रमुख कारणे

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यानंतर जवळपास महिन्याभराने अर्शदीप भारतीय विजयाचा हिरो बनला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेला मुकल्यानंतर अर्शदीपने आफ्रिकेविरुद्ध या सामन्यातून पुनरागमन केले आहे. सामन्यातील दुसरे षटक टाकताना त्याने दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी सलामीवीर क्विंटन डी कॉक, रायली रुसो आणि डेव्हिड मिलर या तीनही अनुभवी फलंदाजांना बाद केले. अर्शदीपने आपल्या 4 षटकात 32 धावा देत तीन गडी बाद केले. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.