IND va SA : राहुलने सिक्स मारून संपवला सामना; भारत मालिकेत 1-0 ने आघाडीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

india vs south africa

IND va SA : राहुलने सिक्स मारून संपवला सामना; भारत मालिकेत 1-0 ने आघाडीवर

India vs South Africa 1st T20 Match: तिरुवनंतपुरम येथे झालेल्या पहिल्या T20I सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 8 विकेट्सनी पराभव केला. तीन सामन्यांच्या T20I मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडिया सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. अलीकडेच टीम इंडियाने टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव केला होता. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धही आपला धडाकेबाज फॉर्म कायम ठेवला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा T20 सामना 2 ऑक्टोबर रोजी गुवाहाटी येथे खेळवला जाणार आहे.

हेही वाचा: IND vs SA T20 : अर्शदीपच्या गोलंदाजीनंतर सूर्या तळपला, मालिकेची विजयी सुरुवात

प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 8 गडी गमावून 106 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 20 चेंडू बाकी असताना 8 गडी राखून सामना जिंकला. भारताकडून सूर्यकुमारने 50 आणि केएल राहुलने 51 धावा केल्या.

107 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. तिसऱ्या षटकातच भारताने कर्णधार रोहित शर्माची विकेट गमावली. तो खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. विराट कोहलीही 9 चेंडूत तीन धावा करून बाद झाला. यानंतर केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत भारताला विजय मिळवून दिला.

हेही वाचा: Jasprit Bumrah Injury : T20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का, जसप्रीत बुमराह जखमी

प्रथम फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पहिल्याच षटकात दीपक चहरने धक्का दिला. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चहरने कर्णधार टेंबा बावुमाला क्लीन बोल्ड केले. बावुमा खाते उघडू शकले नाहीत. दुसऱ्याच षटकात अर्शदीप सिंगने तीन बळी घेत आफ्रिकेचे कंबरडे मोडले. त्याने या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर डी कॉक, दुसऱ्या चेंडूवर रिले रुसो आणि मिलरला बाद करून भारताला चौथे यश मिळवून दिले. रुसो आणि मिलर यांना खातेही उघडता आले नाही.

यानंतर वेन पारनेल आणि मार्करम यांच्यात सहाव्या विकेटसाठी 33 चेंडूत 33 धावांची भागीदारी झाली. मार्कराम 24 चेंडूत 25 धावा काढून बाद झाला. महाराज आणि पारनेल यांनी सातव्या विकेटसाठी 47 चेंडूत 26 धावांची भागीदारी केली. त्यानंतर महाराज आणि रबाडाच्या जोडीने झटपट धावा काढल्या.