Arshdeep Singh ला खलिस्तानी म्हटल्याप्रकरणी केंद्र सरकार आक्रमक, जाणून घ्या कारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arshdeep Singh

Arshdeep Singh ला खलिस्तानी म्हटल्याप्रकरणी केंद्र सरकार आक्रमक, जाणून घ्या कारण

Arshdeep Singh Ind vs Pak Asia Cup 2022 : आशिया चषक 2022 चा दुसरा सुपर-फोर सामना रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबईत खेळल्या गेला. या रोमांचक सामन्यात पाकिस्तान संघाने एक चेंडू शिल्लक असताना पाच गडी राखून मोठा विजय मिळवला. टीम इंडियाचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंगने एक झेल सोडला, त्यामुळे त्याच्यावर बरीच टीका होत आहे. इतकेच नाही तर त्याला सोशल मीडियावर ट्रोल पण केले जात आहे.

विकिपीडियावरील अर्शदीप सिंगच्या पेजवर काही बदल करण्यात आले. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने अर्शदीप सिंहच्या विकीपीडिया पेजवरील माहिती कशी बदलली गेली, याबाबत विचारणा करत समन्स बजावलं आहे. भारत हरल्यानंतर विकीपीडिया पेजवर अर्शदीप सिंहचा उल्लेख 'खलिस्तानी राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी खेळण्यासाठी निवड झाला आहे. अशी लिहीण्यात आली.

मंत्रालयाच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खलिस्तानी लिंक भारतामध्ये चुकीच्या पद्धतीने प्रसारित करण्यात येत आहे त्यामुळे असंतोषाची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. पृष्ठातील बदलामुळे अर्शदीप सिंगच्या कुटुंबासाठी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.

पाकिस्तानच्या डावाच्या 17 व्या षटकात अर्शदीप सिंगचा एक सोपा झेल सोडला. सामना संपल्यानंतर लगेचच अर्शदीप सिंगवर टीका सुरू झाली आणि त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. मात्र टीम इंडियाने अर्शदीप सिंगला पूर्ण पाठिंबा दिला आहे. माजी कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे की, कोणतीही चूक करणे हा सामन्याचा भाग असतो, तुम्ही अशा चुकांमधून शिकून पुढे जाता. आमच्या संघाचे वातावरण खूप चांगले आहे, सर्व सीनियर ज्युनियर खेळाडूंसोबत आहेत.