
Ind vs Pak : पराभवासाठी अर्शदीप गुन्हेगार, मात्र 'या' तिघांचं काय?
Ind vs Pak Asia Cup 2022 : आशिया चषक 2022 च्या सुपर 4 सामन्यात रविवारी पाकिस्तानकडून टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यातील पराभवाचे मुख्य कारण अर्शदीप सिंगचा 18व्या षटकात सोडलेला झेल असल्याचे मानले जात आहे. मात्र, भारताच्या पराभवाचे कारण केवळ अर्शदीप सिंगने झेल सोडले नाही, तर 3 खेळाडूंची चूक होती ज्यामुळे भारताचा पराभव झाला.
अर्शदीप सिंगने 18व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर आसिफ अलीचा सोपा झेल सोडला. तेव्हा पासून पराभवाचा सारा दोष त्याच्या डोक्यानवर आला, पण आपण हे विसरू नये की वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार, फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या या पराभवाला युवा अर्शदीप सिंग सारखेच जबाबदार आहेत. त्यांनीही आपली जबाबदारी चोख पार पाडली नाही.
चहल, भुवनेश्वर आणि पांड्याबद्दल बोलायचे झाले तर या गोलंदाजांनी 10 पेक्षा जास्त इकॉनॉमी असलेल्या धावा लुटल्या. या सामन्यात भारतासाठी अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई हे एकमेव गोलंदाज होते. ज्यांनी 7 किंवा त्यापेक्षा कमी इकॉनॉमीने गोलंदाजी केली. भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल आणि हार्दिक पंड्या यांनी 10 किंवा त्याहून अधिक इकॉनॉमीने धावा दिल्या. प्रत्येकाला प्रत्येकी एक विकेट मिळाली, पण इतक्या धावा लुटल्यामुळे संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.