Arshdeep Singh : अर्शदीपच्या कामगिरीवर पंजाब किंग्जची मालकीण फिदा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arshdeep Singh

Arshdeep Singh : अर्शदीपच्या कामगिरीवर पंजाब किंग्जची मालकीण फिदा

Preity Zinta Arshdeep Singh : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील पहिल्या T20 सामन्यात भारताने 8 गडी राखून विजय मिळवला. यासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 106 धावा केल्या, प्रत्युत्तरात टीम इंडियाने हे लक्ष्य केवळ 2 विकेट गमावून पूर्ण केले. वरिष्ठ गोलंदाजांच्या अनुपस्थितीत अर्शदीप सिंगने अप्रतिम गोलंदाजीचे दर्शन करत आफ्रिकन फलंदाजीचे कंबरडे मोडले. दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ अवघ्या 9 धावांवर बाद झाला. त्याचवेळी अर्शदीपच्या या उत्कृष्ट कामगिरीचे आयपीएल संघ पंजाब किंग्सची मालकीण आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने कौतुक केले आहे.

हेही वाचा: IND vs SA : अर्शदीप-दीपकची घातक गोलंदाजी, सुर्याची विक्रमी कामगिरी, विजयाची 5 प्रमुख कारणे

अर्शदीप सिंग टीम इंडियाच्या संघाचा एक भाग आहे. आयपीएलमधील सर्वोत्तम गोलंदाजीनंतर अर्शदीपने टीम इंडियात स्थान मिळवले आहे, तेव्हापासून त्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. पंजाब किंग्जची मालकीण बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटानेही अर्शदीपचे अभिनंदन केले. अर्शदीप आयपीएलमध्ये पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करतो. प्रितीने लिहिले - व्वा, मॅन ऑफ द मॅच. किती छान जबरदस्त प्रदर्शन. त्याने टाळ्या वाजवणारे इमोजीही शेअर केले.

हेही वाचा: T20 World Cup : अर्शदीप सिंग-दीपक चहरने सीनियर्सचे वाढवले टेन्शन, केला मोठा दावा!

अर्शदीप सिंगने डावाच्या दुसऱ्याच षटकातच आफ्रिकेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याने या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर डी कॉक, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर रिले रुसो आणि मिलरला बाद करून भारताला चौथे यश मिळवून दिले. रुसो आणि मिलर यांना खातेही उघडता आले नाही. अर्शदीपने 2019 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. यादरम्यान त्याने आतापर्यंत 37 सामने खेळले आहेत. ज्यात 26.35 च्या सरासरीने 40 बळी घेतले आहेत आणि त्याचा इकॉनॉमी रेट 8.35 आहे.