Arshdeep Singh throws ball at Daryl Mitchell
esakal
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० वर्ल्डकपचा अंतिम सामना सुरू आहे. या सामन्यात भारताने आपली पकड मजबूत केली आहे. मात्र, याच वेळी मैदानावर थोडा तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात डेरिल मिचेल आणि अर्शदीप सिंग यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याची घटना घडली. अखेर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पंचांनी मध्यस्थी करत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला.