Aryna Sabalenka: ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन सबलेंकाच्या बॉयफ्रेंडचे अचानक निधन, पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा

Aryna Sabalenka Boyfriend Death: माजी आईस हॉकीपटू आणि ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन सबलेंकाच्या बॉयफ्रेंडचे अचानक निधन झाल्याचे समोर आले आहे.
Aryna Sabalenka- Konstantin Koltsov
Aryna Sabalenka- Konstantin KoltsovInstagram

Aryna Sabalenka Boyfriend Death: माजी एनएचएल आईस हॉकी खेळाडू कोनस्टाटीन कोल्तसोवचे निधन झाले आहे. तो टेनिस स्टार अरिना सबलेकांचा बॉयफ्रेंडही होता. प्रथम दर्शनी ही स्पष्ट आत्महत्या असल्याचे निरिक्षण मियामी पोलिसांनी नोंदवले आहे. त्यामुळे त्याचदृष्टीकोनातून याबाबत चौकशी केली जाणार आहे.

पोलिस प्रवक्ता अर्गेमिस कोलोम यांनी सांगितले की सोमवारी रात्री 12 वाजून 39 मिनिटांनी जो मेल आला त्यात लिहिले होते की रेंट रेजिस बाल हार्बर रिसॉर्टमध्ये एका व्यक्तीने बाल्कनीतून उडी मारली आहे.

त्यानंतर मियामी पोलिस विभागाच्या होमिसाईड ब्यूरो तातडीने तिथे पोहचले आणि त्यांनी तपासणी केली. यात कोणत्याची षडयंत्राची शक्यता कमी असल्याचे निरिक्षण पोलिसांनी नोंदवले.

Aryna Sabalenka- Konstantin Koltsov
IPL 2024 : ऋषभ पंत आल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने घेतला महत्त्वाचा निर्णय! फ्रँचायझीने रात्री केली मोठी घोषणा

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की येत्या आठवड्यात सबलेंका मियामी ओपन स्पर्धा खेळणार होती. परंतु आता 25 वर्षीय सबलेंका या घटनेनंतर या स्पर्धेत खेळणार की माघार घेणार याबाबत साशंकता आहे. सबलेंकाने नुकतेच जानेवारीमध्ये दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली होती.

तिच्याप्रती अनेक खेळाडूंनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. ती आणि कोल्तसोव 2021 पासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यांनी अनेकदा सोशल मीडियावरही फोटोही पोस्ट केले आहेत. कोल्तसोवने 2020 मध्ये पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला होता. त्याला तीन मुलेही आहेत.

त्याच्या निधनाबद्दल सर्वात आधी बेलारुसी हॉकी फेडरेशनने माहिती दिली होती. फेडरेशनच्या वेबसाईटवर 'आम्ही शोक व्यक्त करतो. कोनस्टाटीनचे कुटुंब, मित्रपरिवास आणि त्याच्याबरोबर काम केलेल्या सर्वांप्रती बेलारुसी हॉकी फेडरेशन संवेदना व्यक्त करत आहोत.'

Aryna Sabalenka- Konstantin Koltsov
Wanindu Hasaranga : निवृत्तीतून यू-टर्न घेणाऱ्या खेळाडूवर ICC ने घेतली मोठी ॲक्शन! 'या' चुकीमुळे सस्पेंड, आता IPL खेळणार?

कोल्तसोव 2003 ते 2006 दरम्यान पिच्सबर्ग पेंग्विनकडून 144 सामने खेळला आहे.त्याचबरोबर 2002आणि 2010 मध्ये तो विंटर ऑलिम्पिकमध्येही खेळला होता. तसेच त्याने 9 वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धाही बेलारुसकडून खेळल्या आहेत.

2016 साली त्याने खेळाडू म्हणून निवृत्ती घेतली. त्याने नंतर प्रशिक्षण क्षेत्रातही पाऊल ठेवले होते. त्याने गेली दोन वर्षे कॉन्टिनेंटल हॉकी लीगमध्ये सलावत युलाएव उफा संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणूनही काम सांभाळले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com