Ashes : अखेर इंग्लंडची तडफड थांबली; ऑस्ट्रेलियाचा सलग दुसरा विजय

Ashes Series
Ashes Seriesesakal

अ‍ॅडलेड : अ‍ॅशेस मालिकेतील (Ashes Series) दुसऱ्या ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला विजयासाठी 467 धावांचे मोठे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने (Australia vs England) कसोटीच्या पाचव्या दिवशी चहापानापर्यंत झुंज दिली. मात्र जे रिचर्डसनने इंग्लंडचा निम्मा संघ माघारी धाडत इंग्लंडचा दुसरा डाव 192 धावात गुंडाळला. ऑस्ट्रेलियाने अ‍ॅडलेड कसोटी 275 धावांनी जिंकत मालिकेत 2 - 0 अशी आघाडी घेतली. या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियाने अ‍ॅडलेडवरील दिवस रात्र कसोटीतील आपले शंभर टक्के विनिंग पर्सेंटेज अबाधित राखले.

Ashes Series
न्यूझीलंड वर्षात दोन वेळा करणार पाकिस्तान दौरा

ऑस्ट्रेलियाने (Australia) दिवस रात्र खेळवल्या जाणाऱ्या अ‍ॅडलेड कसोटीत आपला पहिला डाव 473 धावांवर घोषित केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला (England) पहिल्या डावात 236 धावात गुंडाळत 237 धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव 230 धावांवर घोषित करत इंग्लंड समोर 467 धावांचे मोठे आव्हान ठेवले. (Ashes Series)

भले मोठे आव्हान घेऊन मैदनात उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली. हमीद भोपळाही न फोडता माघारी गेला. त्यानंतर डेव्हिड मलान आणि रोरी बर्न्स यांनी डाव सावण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी संघाला 48 धावांपर्यंत पोहचवले असतानाच नेसेरने डेव्हिड मलानला 20 धावांवर बाद करत अजून एक धक्का दिला. संघाच्या 70 धावा झाल्या असताना जे रिचर्डसनने (Jhye Richardson) रोरी बर्न्स (Rory Burns) 34 धावांवर बाद केले. यानंतर इंग्लंडची गळती सुरु झाली.

Ashes Series
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेबाबत संभ्रम; CSAने देशांतर्गत स्पर्धा केली रद्द

इंग्लंड शंभरी गाठोपर्यंत जो रुट, ओली पोप आणि बेन स्टोक्स माघारी गेले होते. त्यामुळे इंग्लंडची अवस्था 6 बाद 105 धावा अशी झाली. मात्र त्यांनतर जोस बटलर ( Jos Buttler) आणि ख्रिस वोक्स(Chris Woakes) यांनी झुंजार फलंदाजी करण्यास सुरुवात केली. या दोघांनी डिनरपर्यंत किल्ला लढवत इंग्लंडला 150 च्या जवळ पोहचवले. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला आणखी यश मिळू दिले नाही.

मात्र डिनरनंतर ऑस्ट्रेलियाने ही अर्धशतकी भागीदारी करणारी जोडी फोडली. जे रिचर्डसनने (Jhye Richardson) 44 धावा करणाऱ्या ख्रिस वोक्सला बाद करत आपला तिसरा बळी टिपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी आता फक्त 3 विकेट्सची गरज होती. दरम्यान, 39 चेंडू खेळणारा रॉबिन्सन अखेर लायनने बाद करत इंग्लंडला आठवा धक्का दिला.

वोक्स बाद झाल्यानंतर जोस बटलरने चहापानापर्यंत किल्ला लढवला. मात्र चहापानानंतर जे रिचर्डसनने जोस बटलरला 26 आणि जेम्स अँडरसनला 2 धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाचा लांबलेला विजय साकार केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com